हनुमान जयंतीच्या निमित्ताने आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते आरती !

विष्णु घाट येथे आरती करतांना आमदार सुधीर गाडगीळ

सांगली, २७ एप्रिल (वार्ता.) – हनुमान जयंतीच्या निमित्ताने भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते विष्णु घाट, तपोवन येथे आरती करण्यात आली. या वेळी आमदार गाडगीळ यांनी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले. या वेळी मंदिरातील पुजारी विनायक गुरव, नगरसेवक युवराज बावडेकर, उर्मिला बेलवलकर, प्रथमेश वैद्य, अमित कुलकर्णी, वैभव पाटील यांसह त्या भागातील नागरिक उपस्थित होते.