शहरी नक्षलवादी विल्सन यांची निर्दोष मुक्त करण्याची याचिका

देशद्रोही शहरी नक्षलवाद्यांना अमेरिकेतूनही अशा प्रकारचे साहाय्य मिळत आहे, असाच याचा दुसरा अर्थ होतो !

राज्यात ४५ लाखांहून अधिक न्यायालयीन खटले प्रलंबित !

एखादा खटला ३५ ते ४० वर्षे चालतो आणि त्यानंतर निकाल लागतो, याला न्याय म्हणता येईल का ?

अन्सारी आणि असुरक्षितता !

अन्सारी यांची वक्तव्ये हा वैचारिक आतंकवादाचा प्रकार आहे, जो जिहादी आतंकवादापेक्षाही भयंकर आहे. हे लक्षात घेऊन त्यांच्या वक्तव्यांचा सर्वच व्यासपिठांवरून वैचारिक प्रतिवाद करणे आवश्यक आहे. यासाठी धर्मप्रेमी, राष्ट्रप्रेमी आणि त्याहून अधिक सरकारने कठोर प्रयत्न करणे आवश्यक !

धुळे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभेत कार्यकर्त्यांचा गोंधळ !

राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवनात ९ फेब्रुवारी या दिवशी आयोजित केलेल्या ‘परिवार संवाद’ कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील आले होते. त्या वेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सत्कार करतांना छायाचित्र काढण्यासाठी रेटारेटी केल्याने गोंधळ झाला.

देवगड पंचायत समितीच्या शिक्षण विभागात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार !

देवगड पंचायत समितीच्या जिल्हा परिषद शिक्षण विभागामध्ये ४ कर्मचार्‍यांनी कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला आहे. या रकमेमधून त्यांनी मोठे बंगले बांधले असून गावाकडे स्थावर संपत्ती विकत घेतली आहे.

मातृभाषा किमान प्राथमिक स्तरावर वाचवण्यासाठीच्या आंदोलनाची सिद्धता करण्यासाठी ‘भाभासुमं’ची २० फेब्रुवारीला बैठक

आपणास ठाऊक आहेच की, देशात नवीन शैक्षणिक धोरण लागू झाले आहे. त्यात मातृभाषा माध्यमाचा गाजावाजा जरी चालू झालेला असला, तरी गोवा सरकार या सूत्रावर अजून काहीच सांगत नाही; परंतु शैक्षणिक धोरण येत्या जूनपासून लागू करणार, असे घोषित केले आहे.

आंगणेवाडीवासियांच्या आरोग्य तपासणीसाठी २ मार्चपासून ४ आरोग्यपथके कार्यरत असणार

यात्रेनिमित्त गावात येणार्‍या आंगणे कुटुंबियांची आरोग्य तपासणी करण्यासाठी २ मार्चपासून गावात ४ आरोग्यपथके कार्यरत असतील, अशी माहिती गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी दिली आहे.

वर्ष २०२१ च्या गोव्याच्या अर्थसंकल्पात शासन कर किंवा शुल्क यांमध्ये कपात करण्याच्या विचारात

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अर्थसंकल्पाला अनुसरून ‘सी.आर्.ई.डी.ए.आय.’, ‘जी.एस्.ए.’ आणि लहान हॉटेल व्यावसायिक यांच्यासमवेत ११ फेब्रुवारी या दिवशी बैठक घेतली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.

अनधिकृतपणे चालू असलेले ‘धिर्यो’ आणि पशूवधगृहे यांच्यावर कारवाई करा अन्यथा कायदेशीर कारवाई करू ! – गोवंश रक्षा अभियान

दक्षिण गोव्यात कोलवा, बाणावली आदी ठिकाणी अनधिकृतपणे ‘धिर्यो’चे (बैल किंवा रेडे यांच्या झुंजीचे) आयोजन केले जात आहे, तसेच दक्षिण गोव्यात अनेक ठिकाणी अनधिकृत पशूवधगृहे कार्यरत आहेत.

शेअर्सच्या व्यवहारात ७०० हून अधिक जणांना ३० कोटी रुपयांचा गंडा घालणार्‍यावर गुन्हा नोंद !

पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे अक्षय याने अनेक लोकांना गंडा घातला.