जेजुरी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण !
राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांच्या हस्ते १३ फेब्रुवारी या दिवशी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जेजुरी गडावर उभारण्यात आलेल्या १२ फुटी पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांच्या हस्ते १३ फेब्रुवारी या दिवशी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जेजुरी गडावर उभारण्यात आलेल्या १२ फुटी पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
अटक झाल्यानंतर वर्षानुवर्षे खटले प्रलंबित रहातात आणि प्रत्यक्ष निकाल लागेपर्यंत संबंधित शासकीय चाकरीचा लाभ घेत रहातात. त्यामुळे जोपर्यंत तात्काळ निकाल आणि कठोर शिक्षेची तरतूद होत नाही तोपर्यंत अशा प्रकारांना आळा घालणे हा एक फार्सच ठरत आहे
प्रतिवर्षी क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने १७ फेब्रुवारी या दिवशी सांगली नगर वाचनालयाच्या वतीने पुरस्कार दिला जातो.
हमीभावापेक्षा अल्प दराने साखर विक्री करणार्या, तसेच साखरेचा कोटा स्थिर न ठेवणार्या साखर कारखान्यांवर फौजदारी कारवाई करण्याची चेतावणी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी १२ फेब्रुवारी या दिवशी दिली.
या चर्चासत्राचे प्रक्षेपण १५ फेब्रुवारी या रात्री १० वाजता, १६ फेब्रुवारी या दिवशी सकाळी १० वाजता, तसेच १७ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ७ वाजता याचे पुनर्प्रक्षेपण होणार आहे. तरी अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यातील खालापूर पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांना ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात निवेदन देण्यात आले. तसेच खोपोली येथील पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार यांनाही निवेदन देण्यात आले.
तक्रारदार रिक्शा चालकाच्या रिक्शावर वाहतूक विभागाने केलेली कारवाई रहित करण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेचे हवालदार गोकुळ झाडखडे यांनी सुमित पवार यांच्या वतीने ३०० रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न!
बीड जिल्ह्यातील परळी येथील पूजा चव्हाण या २२ वर्षीय युवतीने ८ फेब्रुवारी या दिवशी पुणे येथील वानवडी भागात आत्महत्या केली. या युवतीच्या आत्महत्या प्रकरणी शिवसेनेच्या एका नेत्याचे नाव समोर येत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमधील वीजग्राहकांकडे वीजदेयकांची एकूण १ सहस्र ९६२ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
जगाच्या कोणत्याही देशात इतकी वर्षे अशी एखादी भीषण समस्या तशीच भिजत ठेवल्याची उदाहरणे विरळ असतील !