
कोल्हापूर, १३ फेब्रुवारी (वार्ता.) – ‘अॅक्युप्रेशर’ या चिकित्सापद्धतीवर कोल्हापूर येथील वृत्तवाहिनी ‘बी’ न्यूजवर ‘संवाद-प्रतिवाद’ या चर्चासत्रात सनातन संस्थेचे साधक डॉ. उमेश लंबे सहभागी झाले होते. ‘बी’न्यूजचे संपादक श्री. चारुदत्त जोशी यांनी घेतलेल्या या चर्चासत्रात डॉ. लंबे यांनी ‘अॅक्युप्रेशर’ या चिकित्सापद्धतीने स्वतःवर कसे उपचार करायचे, येणार्या भीषण आपत्काळात ‘अॅक्युप्रेशर’ या चिकित्सापद्धतीचा कसा वापर होऊ शकतो, अॅक्युप्रेशरचे सिद्धांत, ही पद्धती कशी काम करते आणि प्रत्यक्ष त्याने कसे उपचार करावेत, यांसह अन्य विषयांवर माहिती दिली. या चर्चासत्राचे प्रक्षेपण १५ फेब्रुवारी या रात्री १० वाजता, १६ फेब्रुवारी या दिवशी सकाळी १० वाजता, तसेच १७ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ७ वाजता याचे पुनर्प्रक्षेपण होणार आहे. तरी अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
‘रोटरी क्लब ऑफ हुपरी’च्या वतीने १५० गरजू मुलींना विनामूल्य सायकलवाटप
पावसाची उसंत : नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर दर्शनासाठी उघडले !
पंचमहाभूतांमधील असंतुलन : कलियुगातून सत्ययुगाकडे वाटचाल !
जपमाळ