हुतात्मा सैनिक संग्राम पाटील यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात निगवे खालसा (कोल्हापूर) येथे अंत्यसंस्कार
हुतात्मा सैनिक संग्राम पाटील यांचा मुलगा शौर्य याच्या हस्ते अग्नी देण्यात आला.
हुतात्मा सैनिक संग्राम पाटील यांचा मुलगा शौर्य याच्या हस्ते अग्नी देण्यात आला.
केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाचे (एन्.सी.बी. चे) तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह इतर कर्मचार्यांवर आक्रमण करण्यात आले आहे. अमली पदार्थ विकणार्यांकडून (ड्रग्ज पेडलर्सकडून) हे आक्रमण मुंबईतील गोरेगावमध्ये २२ नोव्हेंबरच्या सायंकाळी केले आहे.
देहली, राजस्थान, गुजरात, गोवा या चार राज्यांमधून महाराष्ट्रात विमान, रेल्वे यांद्वारे येणार्यांना कोरोनाची चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. या प्रवाशांचा कोरोनाचा आर्.टी.पी.सी.आर्. अहवाल हा ‘निगेटिव्ह’ असणे आवश्यक आहे, असा आदेश महाराष्ट्र सरकारने काढला आहे.
बिहारमध्ये लव्ह जिहादच्या विरोधात कायदा झाल्यानंतर महाराष्ट्रात विचार करू, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश येथे लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करण्यात येत आहे.
संभाजीनगर-पैठण रस्त्यावरील धुपखेडा येथील प्रसिद्ध असलेल्या श्री साईबाबांच्या मंदिरात २३ नोव्हेंबरच्या पहाटे चोरट्यांनी कुलूप तोडून चोरी केली. यामध्ये साईबाबांच्या मूर्तीचा चांदीचा मुकुट, २ दानपेट्या आणि मंदिराच्या कपाटातील सोन्या-चांदीचे अलंकार चोरट्यांनी पळवले आहेत.
पोलिसांना संशय येऊ नये म्हणून गाडीच्या काचेवर ‘प्रेस’चे ‘स्टिकर’ तसेच ‘निळा प्रहार स्पेशल फोरम तालुका अध्यक्ष’ या नावाचे स्टिकर लावून गांजाची वाहतूक करणार्या रवींद्र योसेफ आढाव आणि गोरक्षनाथ लक्ष्मण दहातोंडे यांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे.
सामाजिक माध्यमातून द्वेषमूलक ‘पोस्ट’ केल्याप्रकरणी वांद्रे महानगर दंडाधिकार्यांनी मुंबई पोलिसांना कंगना राणावत आणि तिची बहिण रंगोली चंडेल यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला कंगना आणि रंगोली यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
कोरोनामुळे नागरिक आर्थिक संकटात असतांना दळणवळण बंदीच्या काळात ग्राहकांना भरमसाठ वीजदेयके दिल्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने राज्यभर वीजदेयकांची होळी करण्यात आली.
कोरोनाच्या संकटातही वर्ष २०२१ मध्ये हरिद्वार येथे कुंभमेळा भव्य-दिव्य होईल, अशी घोषणा उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी केली आहे. या घोषणेपूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानी आखाडा परिषदेसमवेत एक बैठक घेतली.
दक्षिण काशी समजल्या जाणार्या लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या म्हसवड (जिल्हा सातारा) येथील श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या शाही विवाहसोहळ्याची धामधूम चालू झाली आहे. दिवाळी पाडवा ते तुळशी विवाह या १२ दिवसांच्या कालावधीत पारंपरिक पद्धतीने चालत आलेले उभ्या नवरात्रीचे कडक व्रत चालू झाले आहे.