गाडीवर ‘प्रेस’चे ‘स्टिकर’ लावून गांजाची वाहतूक करणार्‍या २ सराईत गुन्हेगारांना पुण्यातून अटक

पोलिसांची फसवणूक करून गांजाची तस्करी करणार्‍यांना कायद्याचे भय नाही. अटक झालेल्या गुन्हेगारांना कडक शिक्षा न दिल्याने आणि त्यांच्यावर पोलिसांचा अंकुश नसल्याने ते परत परत गुन्हे करत आहेत, हे पोलीस खात्याला लज्जास्पद आहे.

पुणे – पोलिसांना संशय येऊ नये म्हणून गाडीच्या काचेवर ‘प्रेस’चे ‘स्टिकर’ तसेच ‘निळा प्रहार स्पेशल फोरम तालुका अध्यक्ष’ या नावाचे स्टिकर लावून गांजाची वाहतूक करणार्‍या रवींद्र योसेफ आढाव आणि गोरक्षनाथ लक्ष्मण दहातोंडे यांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपींविरोधात नगरमधील सोनई पोलीस ठाण्यामध्ये मद्यविक्रीचा गुन्हा नोंद आहे. त्यांच्याकडून ३७ किलो २०० ग्रॅम वजनाचा साडेनऊ लाख रुपयांचा गांजा हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई विमाननगर परिसरात करण्यात आली.