उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांची घोषणा
हरिद्वार (उत्तराखंड) – कोरोनाच्या संकटातही वर्ष २०२१ मध्ये हरिद्वार येथे कुंभमेळा भव्य-दिव्य होईल, अशी घोषणा उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी केली आहे. या घोषणेपूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानी आखाडा परिषदेसमवेत एक बैठक घेतली.
१. रावत यांनी म्हटले की, कुंभची वर्षानुवर्षाची परंपरा आणि संस्कृती यांचा मान राखला जाईल. कोरोना संक्रमणामुळे यंदा काही व्यावहारिक समस्या निर्माण झालेल्या आहेत; परंतु कुंभ चालू होतांना कोरोनाची परिस्थिती कशी
आहे? हे ध्यानात घेऊन कुंभमेळ्याच्या स्वरूपाचा विस्तार केला जाईल. यासाठी आखाडा परिषद आणि साधू-संत यांचा सल्लाही घेतला जाणार आहे. कुंभमेळ्यासाठी येणार्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी सरकार प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
२. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी राज्य सरकारला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.