वेळेत दोषारोपपत्र सादर न करणार्या अधिकार्यांवर कारवाई न झाल्यास मोर्चा काढू ! – मनसेची चेतावणी
सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे
सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे
देशासाठी सैन्यात भरती होण्याचा निश्चय करून ते ध्येय साध्य करणार्या श्रीमती रावराणे यांच्यासारख्या रणरागिणींची आज देशाला आवश्यकता आहे.
महावितरण शासकीय असल्याने ते खासगी आस्थापनाप्रमाणे ग्राहकांना लुबाडण्याची शक्यता अल्प आहे; परंतु येथे मानवी चुकांचे प्रमाण अधिक असल्याने ग्राहकांना मनस्ताप भोगावा लागत आहे. अशा चुका करणार्या कर्मचार्यांवर तात्काळ कठोरात कठोर कारवाई झाली, तरच त्या चुका अल्प होऊ शकतात.
कोरोनाचा वाढता संसर्ग आणि कोरोनावरील लस यांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, २४ नोव्हेंबरला सकाळी साडेदहा वाजता सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे अधिकारी यांची ऑनलाईन बैठक आयोजित केली आहे.
सर्वच राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे आम्ही ऐकत आहोत. त्यामुळे सर्व राज्यांनी सद्यपरिस्थितीचा अहवाल सादर करावा. राज्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य ती सिद्धता केली नाही, तर डिसेंबरमध्ये परिस्थिती यापेक्षाही भयंकर होऊ शकते.
आयुषच्या डॉक्टरांना केंद्र सरकारने संमत केलेले मिश्रण आणि गोळ्या रुग्णाने घेण्यासाठी लिहून देण्याच्या केरळ उच्च न्यायालयाच्या अनुमतीच्या विरोधातील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने हा निर्णय दिला.
निवृत्तीवेतन घेणार्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्यांच्या अडचणी प्राधान्याने सोडवणे अपेक्षित आहे. त्यामुळे शासनाने सर्व प्रकरणांची चौकशी करून निवृत्तीवेतन धारकांना न्याय द्यावा आणि कामचुकारपणा करणार्यांना कठोर शिक्षा द्यावी, ही अपेक्षा !
गोव्यात येणार्या पर्यटकांनी मास्क घातला नाही, तर आजपासून २०० रुपये दंड आकारला जाईल.
महिलांच्या साहाय्यासाठी पोलीस खात्याने १०९१ हा ‘हेल्पलाईन’ क्रमांक कार्यान्वित केला आहे.
डॉ. मसुरकर वेळेत उपस्थित नसल्याने रुग्ण ताटकळत असल्याचे निदर्शनास आले.