डिसेंबरपासून गोवा शासन मोठ्या प्रमाणावर नोकरभरती करणार : १० सहस्रांहून अधिक रिक्त पदे भरणार

गोवा शासन डिसेंबर मासापासून मोठ्या प्रमाणावर नोकरभरती करणार आहे. शासनाच्या विविध खात्यांमधील सुमारे १० सहस्रांहून अधिक रिक्त पदे भरली जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

२६ नोव्हेंबरला सरकारी कर्मचारी, शिक्षक अन् शिक्षकेतर कर्मचारी देशव्यापी संपावर जाणार

देश कठीण आर्थिक स्थितीतून जात असतांना, लक्षावधी लोक बेरोजगारीला तोंड देत असतांना कर्मचार्‍यांनी अशा प्रकारे संप करून जनतेला आणि सरकारला नाडणे कितपत योग्य ? हक्कांसमवेत चोख कर्तव्याचा विचार कर्मचारी संघटना करतात का ?

केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात महाराष्ट्रात कायदा आणणार !- बाळासाहेब थोरात

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी आणि शेतमालाला हमी भाव दिला नाही, तर संबंधितांविरुद्ध खटला चालवण्याची तरतूद असलेला कायदा करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

कंगना राणावत यांना पोलिसांकडून तिसर्‍यांदा समन्स

कंगना आणि त्यांची बहीण रंगोली यांच्या विरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा नोंद झाला असून त्या संदर्भात तिसर्‍यांदा पोलिसांनी समन्स बजावले आहे. सामाजिक माध्यमांवर केलेल्या आक्षेपार्ह ट्वीटच्या संदर्भात त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

विरोधानंतरही दवर्ली, मडगाव येथे रेल्वेमार्ग दुपदरीकरणाचे काम चालूच

रेल्वेमार्ग दुपरीकरणाच्या विरोधात राज्यात मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जात असूनही या विरोधाला डावलून रेल्वेमार्ग दुपदरीकरणाचे काम चालू झाले आहे. दवर्ली, मडगाव येथे रेल्वे फाटकाजवळील बांधकाम तोडून या कामाला प्रारंभ झाला आहे.

नृसिंहवाडीतील (जिल्हा कोल्हापूर) दत्त मंदिरात नियमांचे पालन करत भाविकांकडून दर्शन

मंदिर खुले झाल्याने आजूबाजूच्या गावांमध्येही चैतन्यमय वातावरण पहावयास मिळाले.

बारामती मधील व्यापार्‍याच्या आत्महत्येप्रकरणी विद्यमान नगरसेवकासह ९ जणांवर गुन्हा नोंद

गुन्हा नोंद असणार्‍या नगरसेवकांचा जनतेला आधार वाटेल का ? जनतेने कोणाला निवडून द्यायचे हे ठरवायला हवे.

विविध किल्ले आणि जलदुर्ग यांच्या प्रतिकृती सिद्ध करणार्‍या बाल-युवा मावळ्यांचा बजरंग दलाच्या वतीने मिरजेत सन्मानचिन्हे देऊन सत्कार

एकच ध्यास । जपू महाराष्ट्राची संस्कृती ॥

‘गोपालन’ हे सर्वांत पुण्यकार्य ! – बाबू कवळेकर, उपमुख्यमंत्री

‘गोपालन’ हे सर्वांत पुण्यकार्य आहे. सिकेरी, मये येथील गोशाळेचे कार्य खूप चांगले आहे. या ठिकाणी सर्वजण नि:स्वार्थीपणे कार्य करत आहेत. गोशाळेला शासनाच्या वतीने अपेक्षित सहकार्य करण्यात येणार आहे, असे आश्‍वासन उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी दिले.

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने पुण्यातील सार्वजनिक छठ पूजेस बंदी

भाविकांनी छठ पूजा घरगुती पद्धतीने खासगी जागेत साजरी करावी असे आवाहन पालिकेने केले आहे.