बारामती मधील व्यापार्‍याच्या आत्महत्येप्रकरणी विद्यमान नगरसेवकासह ९ जणांवर गुन्हा नोंद

गुन्हा नोंद असणार्‍या नगरसेवकांचा जनतेला आधार वाटेल का ? जनतेने कोणाला निवडून द्यायचे हे ठरवायला हवे.

बारामती – शहरातील व्यापारी प्रीतम शशिकांत शहा यांना दिलेल्या व्याजाच्या पैशांपोटी त्यांचा सहयोग सोसायटीमधील ‘बंगला’ नावावर करून घेण्यासाठी मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याविषयी नगरसेवक आणि माजी सभापती यांसह ९ जणांवर ११ नोव्हेंबर या दिवशी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामध्ये विद्यमान नगरसेवक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि एका निवृत्त पोलिसांच्या मुलाचाही समावेश आहे.

या प्रकरणी त्यांचा मुलगा प्रतीक प्रीतम शहा यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. याविषयीच्या तक्रारीत प्रतीक यांनी त्यांच्या वडिलांच्या व्यवहाराविषयीची सविस्तर माहिती नमूद केली आहे.