विविध किल्ले आणि जलदुर्ग यांच्या प्रतिकृती सिद्ध करणार्‍या बाल-युवा मावळ्यांचा बजरंग दलाच्या वतीने मिरजेत सन्मानचिन्हे देऊन सत्कार

विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारणार्‍यांना सन्मानचिन्ह देतांना बजरंगदलाचे कार्यकर्ते आणि विविध किल्ला बनवणारे बालमावळे

मिरज, १९ नोव्हेंबर (वार्ता.) – येथील अनेक विद्यार्थी, युवक यांनी प्रत्येक गल्लीत दीपावलीच्या निमित्ताने किल्ल्यांच्या अत्यंत सुबक, वैशिष्ट्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण प्रतिकृती साकारल्या आहेत. यात प्रतापगड, पन्हाळा, राजगड हे डोंगरी किल्ले, तसेच सिंधुदुर्ग, नळदुर्ग इत्यादी जलदुर्गांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. विद्यार्थी, युवक यांचा उत्साह वाढवण्यासाठी बजरंग दलाचे तालुकाध्यक्ष श्री. आकाश जाधव यांच्या पुढाकाराने सलग दुसर्‍या वर्षी बाल-युवा मावळे आणि शिवप्रेमी तरुण यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारणार्‍यांना सन्मानचिन्ह देतांना बजरंगदलाचे कार्यकर्ते आणि विविध किल्ला बनवणारे बालमावळे

या संदर्भात श्री. आकाश जाधव म्हणाले, प्रोत्साहन मिळून अनेक धर्मप्रेमी युवा मावळे सिद्ध व्हावेत, याच उद्देशाने छत्रपती शिवराय, प्रभू श्रीराम आणि बजरंग दल यांचे मानचिन्ह असलेली ५० सन्मानचिन्हे मिरजेत देण्यात आली. स्पर्धा घेण्यापेक्षा प्रत्येक प्रतीकृतीला एक सन्मानचिन्ह देऊन सर्वांनाच प्रोत्साहन मिळेल, हा उद्देश आम्ही ठेवला होता.

मानचिन्हावर छापण्यात आलेला स्फूर्तीदायक श्‍लोक

पुन्हा पसरवू महाराष्ट्राची किर्ती ।
शिवरायांची स्मरूनी मूर्ती ॥
शिवप्रभूंची घेऊ स्फूर्ती ।

एकच ध्यास ।
जपू महाराष्ट्राची संस्कृती ॥