कोकणात येणार्‍या गणेशभक्तांसाठी विशेष रेल्वेगाड्या सोडा ! – भाजपचे नेते नीलेश राणे यांची मागणी

गणेशचतुर्थीच्या काळात कोकणात येणार्‍या गणेशभक्तांसाठी विशेष रेल्वेगाड्या सोडाव्यात, अशी मागणी माजी खासदार तथा भाजपचे नेते नीलेश राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.

पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात रुग्णालयात भरती

रक्तदाब वाढल्याने पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात यांना २३ जुलै या दिवशी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले.

हरिद्वार येथील ‘हर की पौडी’ येथे वीज कोसळून ८० फूट लांब भिंत कोसळली

हरिद्वार (उत्तराखंड) येथील ‘हर की पौडी’ गावातील ब्रह्मकुंडजवळ २१ जुलैच्या मध्यरात्रीनंतर वीज कोसळली. यामुळे ८० फूट लांबीची भिंत पडली; मात्र येथील मंदिर सुरक्षित राहिले.

राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी केलेल्या विधानाचा शिवसेनेकडून निषेध

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असलेले उदयनराजे भोसले यांनी राज्यसभेत खासदारकीची शपथ घेतांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतले होते….

पुरातत्व खात्याची फलनिष्पत्ती काय ?

पश्चिम घाटाच्या डोंगरदर्‍यांमध्ये अभिमानाने उभे असलेल्या गडांवरील समाधीस्थळे, ऐतिहासिक वास्तू, तसेच त्यांवर असलेली लढवय्ये सेनापती आणि वीर मावळे यांची स्मारके यांची नियमित देखभाल करणे आवश्यक आहे.

आवश्यकता वाटल्यास अमेरिकेतील अन्य ठिकाणचे चिनी दूतावासही बंद केले जाऊ शकतात ! – ट्रम्प यांची चेतावणी

जर आवश्यकता भासली, तर चीनचे अमेरिकेतील अन्य ठिकाणचे दूतावासही बंद करण्यात येऊ शकतात, अशी चेतावणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.

‘कृतार्थ म्हार्दोळ’ संघटनेच्या वतीने ‘ऑनलाईन’ श्री गणेश पूजाविधी

गणेशभक्तांची ही अडचण दूर करण्यासाठी ‘कृतार्थ म्हार्दोळ’ या संस्थेने तज्ञ पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष पूजाविधीचे ध्वनीमुद्रण (ऑडिओ) आणि ध्वनीचित्रीकरण (व्हिडीओ) सिद्ध केले आहेत.

उत्तर कोरियात ‘मास्क’ न वापरणार्‍यांना ३ मास सक्त मजुरीची शिक्षा

उत्तर कोरियात ‘मास्क’ न वापरणार्‍या नागरिकांना ३ मास सक्त मजुरीची शिक्षा देण्याचा आदेश या देशाचे हुकूमशहा तथा राष्ट्राध्यक्ष किम जोंग यांनी दिला. ‘या कठोर शिक्षेच्या धाकामुळे तरी नागरिकांकडून ‘मास्क’चा वापर करण्यात येईल’, असा विश्‍वास उत्तर कोरियाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

कोरोनाबाधितांवर उपचार करतांना कोरोनाची लागण झालेल्या डॉक्टरचा मृत्यू

एका डॉक्टरविषयी अशी असंवेदनशील असणारी रुग्णालय सर्व सामान्य जनतेशी कशी वागत असतील, हे लक्षात येते !