आवश्यकता वाटल्यास अमेरिकेतील अन्य ठिकाणचे चिनी दूतावासही बंद केले जाऊ शकतात ! – ट्रम्प यांची चेतावणी

डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन (अमेरिका) – तुम्हाला ठाऊकच झाले असेल की, ह्युस्टन येथील चीनचे वाणिज्य दूतावास बंद करण्याच्या आदेशानंतर तेथे कागदपत्रे जाळण्यात आली. हे संशय निर्माण करणारे आहे. आमच्यासमोर सर्व पर्याय उपलब्ध आहेत. जर आवश्यकता भासली, तर चीनचे अमेरिकेतील अन्य ठिकाणचे दूतावासही बंद करण्यात येऊ शकतात, अशी चेतावणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. अमेरिकेत चीनचे एकूण ५ वाणिज्य दूतावास आहेत. ह्युस्टन शहरातील चीनचे दूतावास ७२ घंट्यांत बंद करण्याचा आदेश दिल्यावर तेथे कागद जाळण्यात येत असल्याचे दिसून आले होते.