‘कृतार्थ म्हार्दोळ’ संघटनेच्या वतीने ‘ऑनलाईन’ श्री गणेश पूजाविधी

प्रतीकात्मक चित्र

फोंडा – कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर यंदा गणेशचतुर्थीला प्रत्यक्ष पूजाविधी करण्यासाठी पुरोहित उपलब्ध होणे शक्य होणार नाही. गणेशभक्तांची ही अडचण दूर करण्यासाठी ‘कृतार्थ म्हार्दोळ’ या संस्थेने तज्ञ पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष पूजाविधीचे ध्वनीमुद्रण (ऑडिओ) आणि ध्वनीचित्रीकरण (व्हिडीओ) सिद्ध केले आहेत. याची ‘लिंक’ संस्थेच्या वतीने भाविकांना पाठवली जाणार आहे. यामुळे ‘ऑनलाईन’ श्री गणेशपूजन करणे शक्य होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन ‘कृतार्थ म्हार्दोळ’ संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी केले आहे. फोंडा येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी संस्थेचे खजिनदार जयंत मिरींगकर, सचिव आनंद वाघुर्मेकर आणि पुरोहित नारायण बोरकर यांचीही उपस्थिती होती.

श्रीदत्त पद्मनाभ पिठाचा श्रावणातील सणांसाठी ‘ऑनलाईन पूजा’ पोर्टल

यंदा कोरोना महामारीच्या सावटाखाली श्रावणातील सण, उत्सव आणि व्रते साजरी करावी लागत आहेत. यासाठी प्रत्यक्ष पुरोहित उपलब्ध होऊ शकणार नाहीत, तरीही धार्मिक कार्यात खंड पडू नये, यासाठी तपोभूमी (कुंडई) येथील श्रीदत्त पद्मनाभ पिठाने प.पू. ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑनलाईन पूजा’ पोर्टल चालू केला आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन पिठाच्या वतीने करण्यात आले आहे. श्रावणातील विधींसाठी https://forms.gle/Ft3tNWhNnmZuUuTg9 या ‘लिंक’वर भाविकांनी नावनोंदणी केल्यावर त्यांना पुरोहित ‘ऑनलाईन’ पूजा सांगणार आहेत.