हरिद्वार येथील ‘हर की पौडी’ येथे वीज कोसळून ८० फूट लांब भिंत कोसळली

हरिद्वार (उत्तराखंड) – येथील ‘हर की पौडी’ गावातील ब्रह्मकुंडजवळ २१ जुलैच्या मध्यरात्रीनंतर वीज कोसळली. यामुळे ८० फूट लांबीची भिंत पडली; मात्र येथील मंदिर सुरक्षित राहिले. सोमवती अमावास्येमुळे प्रतिवर्षी येथे लाखो लोक येतात; मात्र दळणवळण बंदीमुळे कुणी येऊ न शकल्याने येथे गर्दी नव्हती. त्यामुळे सुदैवाने येथे जीवितहानी झाली नाही. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी यांनी सांगितले की, ‘वर्ष २०२१ मध्ये येथे कुंभमेळा होणार आहे. सरकारला ‘हर की पौडी’ची डागडुजी करावी लागणार आहे.’