पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात रुग्णालयात भरती

आमदार बाबुश मोन्सेरात

पणजी, २३ जुलै (वार्ता.) – रक्तदाब वाढल्याने पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात यांना २३ जुलै या दिवशी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले. याविषयी माहिती देतांना पणजीचे महापौर उदय मडकईकर म्हणाले, ‘‘आमदार बाबुश मोन्सेरात यांना चक्कर आल्याने गोवा वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चांगली असून २३ किंवा २४ जुलैला उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात येणार आहे.’’