
बाह्यतः जाणिवेच्या कक्षेत आपण सर्व द्वैती आहोत; परंतु त्या पलीकडे काय ? त्या पलीकडे आपण अद्वैती आहोत. वस्तूतः हेच सत्य आहे. अद्वैत मत सांगते की, प्रत्येक व्यक्तीला आत्मरूप समजून तिच्यावर प्रेम करा. ख्रिस्ती धर्मात सांगितल्याप्रमाणे भाऊ समजून नव्हे. भ्रातृभावाऐवजी विश्वात्मक भाव हवा. विश्वबंधुत्व नव्हे, तर विश्वात्मकत्व हे आपले ध्येय आहे. अद्वैत मतात ‘सगळ्यांचे सगळ्यात अधिक सुख’ या मताचाही अंतर्भाव होऊ शकेल.
– स्वामी विवेकानंद
(साभार : ग्रंथ ‘धर्माचे स्वरूप आणि साधन’)