गुरु-शिष्य परंपरेच्या पुनरुज्जीवनासाठी भारत हिंदु राष्ट्र बनणे आवश्यक !

आज गुरु-शिष्य परंपरेला पुनरुज्जीवित करण्याची वेळ आली आहे. समाजामध्ये काही प्रमाणात राष्ट्राविषयी अभिमान असला, तरी धर्मप्रेम असणेही तितकेच आवश्यक आहे. धर्माधिष्ठित राज्यप्रणाली असली, तरच समाजामध्ये एकोपा, सामंजस्यादी दैवी गुणांचा विकास आणि आचरण होते.

सनातन संस्थेत संत होण्यासाठी पात्रता आणि साधना लागते, तसेच येथे एखाद्याला ईश्‍वरनिष्ठ राहूनच पद दिले जाते !

 ‘‘तुमच्या संस्थेत ‘संत’ होणे आणि ‘एखादा साधक संत किंवा सद्गुरु झाल्याचे प्रसिद्ध करणे’, हेसुद्धा इतके सोपे नाही. त्यासाठी पात्रता आणि साधना लागते. ही पुष्कळ मोठी साधना आहे. तुमच्या संस्थेत एखाद्याला पद देणे सोपे नाही. ते तत्त्वाला धरून केले जाते. इतरांप्रमाणे कुणालाही महाराज बनवणे तुमच्याकडे नाही. निवडणुकांमध्ये भ्रष्टाचार करून, वशिल्याने किंवा लाच घेऊन पद दिले जाते. … Read more

गुरु आणि शिष्य

गुरु आणि शिष्य हे दोन दिव्यांमाणे असतात. तेलवात नसलेला दिवा १०० वेळा जरी प्रकाशमान दिव्याजवळ गेला, तरी तो प्रकाशत नाही. शिष्याच्या दिव्यातील ही तेलवात म्हणजे त्याची निष्ठा, श्रद्धा अन् भक्ती.

गुरुसेवा आणि गुरुमंत्राचा जप केल्याने मोक्षप्राप्ती करणार्‍या शिष्यांचे प्रमाण अल्प असणे

मोक्षप्राप्ती करण्यासाठी शिष्यामध्ये अव्यक्त भाव, निर्गुण तत्त्व आणि निर्गुण चैतन्य यांची वृद्धी होणे आवश्यक असते. उत्तम शिष्य गुरुसेवा आणि गुरुमंत्राचा जप करूनही गुरूंच्या सगुण देहात न अडकता गुरुतत्त्वाकडे, म्हणजे निर्गुणाकडे वाटचाल करतो. अशा शिष्यांना मोक्षाची प्राप्ती होते

सनातनचे संत, साधक, दैवी बालक, तसेच आध्यात्मिक प्रगती केलेले सनातनचे हितचिंतक आणि समाजातील हिंदुत्वनिष्ठ यांंचा आत्मोन्नतीदर्शक वैशिष्ट्यपूर्ण आढावा पहाण्यासाठी जिल्हासेवकांकडे संपर्क साधा !

गुरुपौर्णिमा २०१९ पर्यंत ६० टक्के किंवा त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी प्राप्त केलेले सनातनचे दैवी बालक, साधक आणि संत, तसेच सनातनने ओळखलेले त्यांचे नातेवाईक; हितचिंतक, हिंदुत्वनिष्ठ अन् समाजातील संतरत्ने या सर्वांची सूची गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी ८ वाजल्यापासून पहाता येईल. यासाठी जिल्हासेवकांना संपर्क साधावा.

एका ऋषिप्रमाणे पूर्ण जीवन समर्पित करणारे सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचे मार्गदर्शन मिळणे, हे सौभाग्य !

‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेद्वारे हिंदु राष्ट्राचे बीज रोवण्याचे कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे. या बिजाचा वटवृक्ष पुढील काळात हिंदु राष्ट्राच्या रूपामध्ये दिसून येईल. आमचे सौभाग्य आहे की, हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी एका ऋषिप्रमाणे पूर्ण जीवन समर्पित करणारे सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचे आपल्याला मार्गदर्शन मिळाले.’ – श्री. राजन गुप्ता, मंत्री, हिंदु शक्ती वाहिनी, अलवर, राजस्थान. … Read more

अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला उपस्थित असलेल्या संतांच्या आचरणातून त्यांनी स्वतःमध्ये पालट घडवला आहे, हे जाणवते !

‘मी स्वतः गोव्यात (अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला) जाऊन आलो आहे आणि संतांचे संतत्व पाहिले आहे. त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून आणि आचरणातून संतत्व जाणवते. त्यांनी स्वतःमध्ये पालट घडवला आहे, हे जाणवते.’ – श्री. अनिर्बन नियोगी, भारतीय साधक समाज, कोलकाता, बंगाल. (२५.९.२०१८)

गुर्वाज्ञेप्रमाणे भगवंताची उपासना न करणार्‍यांना ईश्‍वरप्राप्ती कशी होणार ?

ते नराः पशवो लोके किं तेषां जीवने फलम् । यैर्न लब्ध्वा हरेर्दीक्षां नार्चितो वा जनार्दनः ॥ – स्कन्दपुराण अर्थ : जे मनुष्य संसारात पशूप्रमाणे जीवन जगतात, अशा मनुष्य-जीवनाला काय अर्थ आहे ? तसेच ज्याने गुर्वाज्ञेप्रमाणे भगवंताची उपासना केली नाही, त्यांना ईश्‍वरप्राप्ती कशी होणार ?  

सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून हिंदु जनजागृती समितीच्या नावे प्रसारित होणार्‍या श्री साईबाबा यांच्यावरील टीकात्मक संदेशाशी हिंदु जनजागृती समितीचा संबंध नाही !

सध्या सामाजिक संकेतस्थळावरून श्री साईबाबा यांच्यावर अश्‍लाघ्य भाषेत टीका करणारा, तसेच त्यांनी केलेल्या चमत्कारांना खोटे ठरवणारा एक संदेश हिंदु जनजागृती समितीच्या नावाने प्रसारित होत आहे. तथापि या संदेशाशी हिंदु जनजागृती समितीचा कोणताही संबंध नाही. – श्री. रमेश शिंदे

निष्क्रीय आणि असंवेदनशील पोलीस !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील आंबेगाव येथे चालू असलेल्या अवैध मद्यविक्रीच्या व्यवसायाची पोलिसांना माहिती दिली, या रागातून गावातील अवैध मद्यविक्रीचा व्यवसाय करणार्‍यांनी ५ जुलैला रात्री पोलिसांसमक्ष दोघांना मारहाण केली.


Multi Language |Offline reading | PDF