कार्तिकी एकादशीच्या कालावधीत ३ दिवस श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन बंद रहाणार

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी ‘ऑनलाईन’ पद्धतीने ‘बुकींग’ करून आलेल्या भाविकांना प्रवेश देण्यात येत आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुणे शहरातील सर्व शाळा तूर्तास बंद

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पुणे शहरातील सर्व शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंद .

५ वर्षांत वीज महामंडळाची ६७ सहस्र कोटी रुपयांची थकबाकी ! – आमदार जयंत पाटील

मागील ५ वर्षांत राज्यात वीज महामंडळाची ६७ सहस्र कोटी रुपयांची थकबाकी आहे. वीज महामंडळाला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्याचे काम चालू आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंधारणमंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हिंदूंनी स्वतःचे आणि स्वतःच्या कुटुंबाच्या रक्षणासाठी स्वरक्षण प्रशिक्षण शिकणे आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

आजची स्थिती पाहिली, तर हिंदु युवक-युवती पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे धर्मापासून दूर जात आहेत. त्यामुळे त्यांचे बौद्धिक धर्मांतर होत असल्याचे लक्षात येत आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नांदेड आणि परभणी येथील धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानाचे आयोजन

महिलांवरील अत्याचार आणि आक्रमणे यांमध्ये वाढ झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये हिंदु महिला, युवती आणि समाज यांच्यात शौर्य जागृत व्हायला हवे.

सनातनचा बालसाधक कु. यशराज देशमुख पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात १३ वा

सनातनचा बालसाधक कु. यशराज सुर्यकांत देशमुख हा महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यालयात इयत्ता ५ वीमध्ये शिकत आहे. फेब्रुवारी मासामध्ये झालेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत २८८ पैकी २६२ गुण मिळवून कु. यशराज याने राज्यात १३ वा क्रमांक मिळवला आहे.

(म्हणे) ‘राजभवनातील मशीद नमाजासाठी उघडा !’ – रझा अकादमी

रझा अकादमीने राजभवनातील मशीद नमाजासाठी उघडण्याची मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे; मात्र राजभवनामध्ये कोणतीही मशीद नसल्याचे सूत्रांच्या हवाल्याने ‘हिंदुस्थान टाइम्स’च्या वृत्तात म्हटले आहे.

वीजदेयक भरणार नाही ! – कोल्हापूर कृती समितीची कोल्हापुरी चपलेच्या फलकाद्वारे चेतावणी

कोल्हापूर कृती समिती वाढीव वीजदेयकांच्या विरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात.

व्यावसायिक वाहनांचा कर माफ करूनही त्यावरील दंडाच्या रकमेची मागणी

कर माफ झाला असेल, तर दंडाची वसुली कशासाठी ?

७ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शिक्षकांची कोरोना पडताळणी पूर्ण करून टप्प्याटप्प्याने शाळा चालू करण्याचा निर्णय ! – जिल्हाधिकारी दौलत देसाई

२३ नोव्हेंबरपासून शाळा चालू करणे बंधनकारक नाही.