लहान मुलांना घेऊन लोकल रेल्वेगाड्यांतून प्रवास करण्यास मनाई 

सद्यस्थितीत पोलीस, वैद्यकीय कर्मचारी, शासकीय कर्मचारी, अधिवक्ता, डबेवाले यांसह महिलांना लोकल रेल्वे गाड्यांतून प्रवास करण्यास अनुमती देण्यात आली आहे. यामध्ये लहान मुलांना घेऊन प्रवास करणार्‍या महिलांचे प्रमाण वाढले असल्याचे रेल्वे प्रशासनाला आढळून आले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुणे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍याला लाच स्वीकारतांना कह्यात घेतले

भ्रष्ट अधिकार्‍यांना कह्यात घेणे, चौकशी करणे आदी जुजबी कारवाई करून न थांबता अशा भ्रष्टाचार्‍यांकडून भ्रष्टाचाराचा सर्व पैसा वसूल करावा !

२८ नोव्हेंबरपासून प्रतिदिन ३ सहस्र भाविकांना पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन !

कार्तिकी यात्रेसाठी होणारी भाविकांची गर्दी टाळण्यासाठी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर २५ ते २७ नोव्हेंबर असे ३ दिवस पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन बंद करण्यात आले होते

गोव्यातही ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा संमत करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी गोव्यात ‘धर्मांतरबंदी कायदा’ कायदा लागू करून त्याची कठोरपणे कार्यवाही करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

कुडाळ येथील राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्‍न तातडीने मार्गी लावण्याचे नियोजन करा ! – पालकमंत्री उदय सामंत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम करतांना कुडाळ तालुक्यामध्ये भूमीचा मोबदला देण्याची २३ प्रकरणे प्रलंबित आहेत.

गोव्यात दिवसभरात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही

गोव्यात कोरोनामुळे २४ घंट्यांत एकही मृत्यू झाला नाही. दिवसभरात २ सहस्र ५२० चाचण्यांपैकी १९८ जण कोरोनाबाधित आढळले. दिवसभरात १६३ रुग्ण बरे झाले. यामुळे प्रत्यक्ष उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या १ सहस्र ३४८ झाली आहे.

बेतुल येथील किल्ल्याच्या संवर्धनासाठी क्षत्रिय मराठा पारंपरिक मासेमार संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्याना निवेदन सादर

छत्रपती शिवाजी महाराज यांनी गोव्यात बेतुल येथे बांधलेल्या किल्ल्याच्या संवर्धनासाठी क्षत्रिय मराठा पारंपरिक मासेमार संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना २८ नोव्हेंबरला निवेदन सादर करण्यात आले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २७ नोव्हेंबरला देहली येथे माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतीभवनमध्ये भेट घेतली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपतींना ५९ व्या गोवा मुक्तीदिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याविषयी निमंत्रण दिले.

बी.एच्.आर्. पतसंस्था घोटाळ्याच्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा पथकाच्या धाडी

ठेवीदारांची फसवणूक करत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी पुणे पोलीस, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण पोलीस यांकडे या घोटाळ्याप्रकरणी ३ गुन्हे नोंद आहेत. अवसायक जितेंद्र कंडारे यांच्या जळगावातील येथील घरी धाड टाकण्यात आली.

महाराष्ट्रात दळणवळण बंदीमध्ये ३१ डिसेंबरपर्यंत वाढ

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असल्यामुळे राज्यशासनाने प्रतिबंधित क्षेत्रातील दळणवळण बंदी ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे.