राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन !

भारत तुकाराम भालके

पंढरपूर – पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा गुरसाळे (तालुका-पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भारत तुकाराम भालके (वय ६० वर्षे) यांचे २७ नोव्हेंबरच्या मध्यरात्री पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा विठ्ठल कारखान्याचे संचालक भगीरथ भालके, सून, ३ विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे. गेल्या काही वर्षांपासून भालके यांना मूत्रपिंडाचा त्रास होत होता. त्यांना कोरोनाचा संसर्गही झाला होता. त्यातून बरे झाल्यानंतर पुन्हा त्यांची प्रकृती बिघडली. उपचार चालू असतांनाच प्राणज्योत मालवली.