महाराष्ट्रात दळणवळण बंदीमध्ये ३१ डिसेंबरपर्यंत वाढ

मुंबई – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असल्यामुळे राज्यशासनाने प्रतिबंधित क्षेत्रातील दळणवळण बंदी ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. दळणवळण बंदीचा कालावधी वाढवतांना सद्यस्थितीत असलेली नियमावली कायम ठेवण्यात आल्या आहेत. याविषयीचा शासकीय आदेश काढण्यात आला आहे.