अन्नधान्याची नासाडी टाळा !

मुंबईत ६९ लाख किलो खाद्यपदार्थ प्रतिदिन कचऱ्यात फेकले जातात.नासाडी अशीच होत राहिली, तर वर्ष २०५० पर्यंत सद्यःस्थितीपेक्षा तिप्पट लोकांवर उपासमारीची वेळ ओढावेल !

‘अग्नीपथ’च्या विरोधातील षड्यंत्र !

राष्ट्रीय लोकदलाच्या वतीने संपूर्ण जुलै मासात उत्तरप्रदेशातील मुसलमानबहुल शहरांत अग्नीपथच्या विरोधात आंदोलनासाठी बैठका घेण्यात येणार आहेत. त्या होण्यापूर्वी सरकारने या देशद्रोही शक्तींचा बंदोबस्त केला पाहिजे !

अल्पवयिनांमधील हिंसकता !

‘आई-वडील मुलाला वळण लावण्यात न्यून पडले असावेत का ? वडिलांचे पिस्तूल घेऊन पुढील कुकर्म करण्याचे धाडस त्याच्यात आले तरी कुठून ? मृतदेहासमवेत ३ दिवस बसण्याइतका तो निष्ठूर आणि निर्दयी कशामुळे झाला असेल ?’, असे अनेक प्रश्न अनुत्तरितच रहातात. त्याची उत्तरे ना समाजाकडे आहेत, ना सरकारकडे !

‘अग्नी’मय पथ !

हिंसाचार केलेल्या युवकांवर गुन्हे नोंदवून त्यांना ‘अग्नीवीर’ बनण्यापासून रोखायला हवे. जे युवक स्वार्थासाठी देशाच्या मालमत्तेची हानी करू पहातात, ते ‘अग्नीवीर’ बनून कोणते देशहित साधणार आहेत ? त्यासाठी त्यांची पात्रता आहे का ? ‘अग्नीवीर’ हे देशाचे वीरपुत्र असले पाहिजेत, जे नीच स्वार्थासाठी नाही, तर देशाची एकता आणि अखंडता यांसाठी झगडतील !

गांधीवाद्यांची हिंसा !

स्वार्थासाठी हिंसक आंदोलन करणाऱ्या काँग्रेसमुळे लोकशाही धोक्यात आली आहे ! जोपर्यंत सत्ता असते, तोपर्यंत स्वतःच्या भ्रष्टाचारावर सहज पांघरूण घालता येते; पण सत्ता ही कुणाच्याही दारी कायमस्वरूपी थांबत नसते आणि सत्य फार काळ लपवून ठेवता येत नाही, याचा विसर काँग्रेसवाल्यांना पडला आणि आज त्याचीच प्रचीती काँग्रेस घेत आहे !

शुक्रवारचा हिंसाचार !

आज केवळ दगडफेक करणारे दंगलखोर धर्मांध उद्या सशस्त्र म्हणजे तलवारी, बंदुका घेऊन सहस्रोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले, तर हिंदूचे रक्षण कोण करणार ? याचा विचार आतापासून केला पाहिजे.

बलात्काऱ्यांचा देश ब्रिटन !

गुन्हेगारांना मोकाट सोडणाऱ्या ब्रिटनलाच आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व देशांनी वेळीच खडसवायला हवे आणि संबंधित आरोपींना कठोर शासन होईपर्यंत ब्रिटनचा जागतिक स्तरावर निषेध व्यक्त करत त्याच्यावर सर्वदृष्ट्या बहिष्कारच घालायला हवा, तरच ब्रिटनला उपरती होईल !

पर्यावरण वाचवा !

साधना करणाऱ्या व्यक्तीत निसर्गातील गोष्टींविषयी संवेदनशीलता असल्याने तिच्याकडून चांगल्याप्रकारे पर्यावरणरक्षणाचे प्रयत्न होऊ शकतात. सध्या होणारी पर्यावरणहानी ही येत्या आपत्काळाचे एक द्योतक आहे; परंतु तद्नंतर येणाऱ्या काळात मानवाला पुनश्च निसर्गाची पूजा करूनच स्वतःचा उत्कर्ष करावा लागणार, हे निश्चित !