श्री दासबोध नित्यपाठ म्हणजे श्री समर्थ उपदेशाचे जणू नवनीतच ! – रमणलाल शहा, ज्येष्ठ ज्योतिर्विद
श्री समर्थ रामदासस्वामी यांनी १७ व्या शतकात ‘ग्रंथराज दासबोध’ची निर्मिती केली. या ग्रंथाच्या माध्यमातून श्री समर्थांनी कालातीत असलेला पारमार्थिक आणि प्रापंचिक उपदेश केला आहे. आताच नाही भविष्यातही शेकडो वर्षे दासबोध ग्रंथोपदेश साधकांना मार्गदर्शक ठरणार आहे.