ठाणे, कल्याण आणि डोंबिवली येथे भाज्यांच्या दरात कमालीची वाढ

राष्ट्रीय आपत्तीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचे मूल्य वाढवून नागरिकांची लूट करणे हा समाजद्रोहच होय ! प्रशासनाने अशा स्वार्थांधांवर त्वरित कारवाई करून जनतेला आधार देणे आवश्यक आहे !

डोंबिवली, २४ मार्च (वार्ता.) – ठाणे, कल्याण आणि डोंबिवली पश्‍चिम येथील गुप्ते रस्ता, नवापाडा, सम्राट चौक रोड, उमेशनगर येथे भरवण्यात येणार्‍या बाजारात भाजीपाला आणि फळे यांच्या मूल्यात विक्रेत्यांनी दुपटीने वाढ केली आहे. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात असून प्रशासनाने संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.