|
वसई – ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत घातपात घडवण्यासाठी रचण्यात आलेला कट मीरा-भाईंदर वसई विरार पोलिसांच्या गुन्हे शाखा २ च्या पथकाने उधळून लावला आहे. पोलिसांनी या प्रकरणी ९ देशी पिस्तुल, २१ जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला असून ८ जणांना अटक केली आहे. ही शस्त्रे उत्तरप्रदेशातून आणण्यात आली होती. मुंबई परिसरात ती विविध लोकांकडे पोचवण्यात येणार होती. अटक केलेले आरोपी गुन्हेगारी क्षेत्रातील असून वसई आणि मुंबई परिसरात शस्त्रे वितरित करण्याचे काम करतात. दिवसा ते वाहन दुरुस्तीच्या ठिकाणी (गॅरेजमध्ये) काम करतात.
Unsecure Mumbai!
Mumbai #TerrorPlot Foiled by Police
– 9 country-made pistols and 21 live cartridges seized
– 8 individuals taken into custody#CrimeNews #MaharashtraElections2024 pic.twitter.com/FK4r2jByFF— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 7, 2024
संपादकीय भूमिकाअशांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यामुळे अन्य गुन्हेगारांना वाचक बसेल ! |