देहलीतील दंगलीविषयी वक्तव्य करणार्‍या इराणला भारताने फटकारले !

भारताच्या अंतर्गत प्रश्‍नांत नाक न खुपसण्याची इराणला तंबी !

  • हिंदूंनो, जगातील इस्लामी देश त्यांच्या धर्मियांच्या बाजूने लगेच संघटित होऊन आवाज उठवतात; मात्र हिंदूंच्या बाजूने आवाज उठवणारा जगात एकही देश नाही, हे लक्षात घेऊन भारताला लवकरात लवकर हिंदु राष्ट्र करण्यासाठी कृतीशील व्हा !
  • भारताने इराणला केवळ फटकारणे पुरेसे नाही, तर त्याला समजेल अशा भाषेत उत्तर द्यायला हवे. असे केले, तरच तो वठणीवर येईल !

नवी देहली – देहलीतील दंगलीवरून भारताला उपदेश करणार्‍या इराणला भारताने फटकारले आहे. इराणचे भारतातील राजदूत अली चेगेनी यांना भारताने समज दिली आली आहे. ‘इराणने भारताच्या अंतर्गत प्रश्‍नांमध्ये नाक खुपसू नये’, असे इराणला बजावण्यात आले.

जवाद जरीफ

१. इराणचे परराष्ट्रमंत्री महंमद जवाद जरीफ यांनी ट्वीट करून म्हटले होते, ‘इराण भारतीय मुसलमानांच्या विरोधात चालू असलेल्या संघटित हिंसेचा निषेध करतो. (देहलीमध्ये हिंदूंच्या विरोधात संघटित हिंसा झाली आहे आणि ती धर्मांधांनी घडवून आणली आहे, हे न पहाता त्याच्या उलट विचार मांडणार्‍या इस्लामी देशांची गोबेल्स नीती जाणा ! – संपादक) अनेक शतकांपासून भारत इराणचा मित्र आहे. आम्ही भारतीय अधिकार्‍यांना विनंती करतो की, त्यांनी सर्व भारतियांच्या भल्यासाठी प्रयत्न करावे आणि अशा प्रकारच्या निरर्थक गोष्टी रोखाव्यात. शांततापूर्ण संवाद साधून पुढील मार्ग काढावा.

२. तत्पूर्वी मुसलमानबहुल इंडोनेशियानेही तेथील भारतीय राजदूतांकडे देहलीतील हिंसाचाराविषयी चिंता व्यक्त केली होती. इंडोनेशियाच्या धार्मिक प्रकरणांच्या मंत्रालयाने म्हटले होते की, देहलीत मुसलमानांच्या विरोधात झालेल्या हिंसेचा आम्ही निषेध करतो. (देहलीतील हिंसाचारात हिंदूंना लक्ष्य करण्यात आले. त्याचा निषेध इंडोनेशिया का करत नाही ?  – संपादक)

३. तुर्कस्तानचे राष्ट्रपती रिसेप तैयप एर्दोेगॉन यांनीही अशा प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली होती.


देहलीतील दंगलीवरून लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित

सतत गोंधळ घालून कामकाज स्थगित करण्यास भाग पाडणार्‍या खासदारांकडून कामकाजासाठी होणारा खर्च वसूल करा !

नवी देहली – देहलीतील दंगलीवरून २ मार्च या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षांनी गदारोळ केल्याने कामकाज स्थगित करण्यात आले होते. ३ मार्चलाही लोकसभेत याच विषयावरून सकाळी गदारोळ झाला. त्यामुळे लोकसभेच्या अध्यक्षांनी प्रथम दुपारी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी २ वाजेपर्यंत कामकाज स्थगित केले. विरोधी पक्षाच्या खासदारांनी देहलीतील दंगलीवर चर्चेची मागणी केली. यावर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ‘प्रश्‍नोत्तराच्या घंट्यानंतर चर्चा करू’, असे म्हटले. तसेच ‘जर कुणी दुसर्‍या खासदाराच्या खुर्चीजवळ गेले, तर त्याला संपूर्ण सत्रासाठी निलंबित केले जाईल’, अशी तंबीही दिली; मात्र तरीही गोंधळ झाल्याने कामकाज स्थगित करण्यात आले.


देशात शांतता, एकता आणि सुसंवाद यांची आवश्यकता ! – पंतप्रधान

 

    नवी देहली – देशात शांतता, एकता आणि सुसंवाद यांची आवश्यकता आहे. शांततेविना देशाचा विकास शक्य नाही, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देहलीमध्ये दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर केले. संसदेच्या ग्रंथालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या संसदीय दलाच्या बैठकीत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘सबका साथ सबका विकास’ या धोरणासमवेत ‘सबका विश्‍वास’ याचीही आवश्यकता आहे.’


देहली पोलिसांवर गोळीबार करणार्‍या महंमद शाहरूख यास अटक

शाहरूख याला अटक करण्यास ८ दिवसांपेक्षा अधिक कालावधी का लागला ?, याचे उत्तर पोलिसांनी द्यायला हवे !

नवी देहली – येथील जाफराबादमध्ये झालेल्या दंगलीच्या वेळी देहलीतील पोलीस हवालदार दीपक दहिया यांच्यावर बंदूक रोखणार्‍या, तसेच हवेत ८ गोळ्या झाडणार्‍या महमंद शाहरूख याला अटक करण्यात आली आहे. वरील घटनेनंतर शाहरूख कुटुंबियांसह पसार (फरार) झाला होता. शाहरूख याला शामली (उत्तरप्रदेश) येथून अटक करण्यात आली आहे. त्याचे कुटुंबीय मात्र अद्याप पसारच आहेत. महत्त्वाचे म्हणजे शाहरूखचे वडील साबीर हाही गुन्हेगार असून ड्रग माफियांशी संबंध असल्याच्या आरोपावरून साबीर यालाही एकदा अटक करण्यात आली होती. (धर्मांध गुन्हेगारांची मुलेही गुन्हेगार होतात, हेच यातून दिसून येते ! – संपादक) देहली पोलिसांनी शाहरूखच्या घरी २ मार्चला धाड टाकली होती. त्या वेळी पोलिसांना प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ज्वलनशील पदार्थ सापडले होते. (धर्मांधांची सिद्धता जाणा ! – संपादक)