यवतमाळ येथील ५५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कु. अनुष्का करोडदेव हिचा जिल्हास्तरीय नाट्यस्पर्धेत प्रथम क्रमांक

कु. अनुष्का करोडदेव हिचा मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करतांना शिक्षक श्री. पळसकर

यवतमाळ, १८ फेब्रुवारी (वार्ता.) – लोहारा परिसरातील आय.एम्.ए. सभागृहामध्ये नुकतेच जिल्हास्तरीय आंतरशालेय नाट्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ५५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली सनातनची साधिका कु. अनुष्का करोडदेव हिची ‘विज्ञान अमर रहे’ या नाटिकेमध्ये उत्कृष्ट अभिनय केल्याविषयी मुलींमधून प्रथम क्रमांकासाठी निवड करण्यात आली. या वेळी शाळेचे शिक्षक श्री. पळसकर यांनी तिचा मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.

डॉ. नंदुरकर विद्यालयात नवव्या इयत्तेत शिकणार्‍या कु. अनुष्का हिने या यशाचे श्रेय सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवलेे, शाळेचे शिक्षक आणि आई-वडील यांना दिले आहे. नोव्हेंबरमध्ये यवतमाळ आकाशवाणी केंद्रावरून या नाटिकेचे प्रसारण करण्यात आले होते.