टोरंटोचे माजी पोलीस अधिकारी डोनाल्ड बेस्ट यांचा घरचा अहेर !
टोरंटो (कॅनडा) – भारतातील परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले होते की, ‘भारतातील गुन्हेगार आणि संघटित गुन्हेगारी सदस्यांना कॅनडा व्हिसा देत आहे.’ कॅनडाच्या व्यवस्थेत त्रुटी आहेत आणि आम्ही स्थलांतरितांची अजिबात चौकशी करत नाही. असे दिसते की, भारत आणि इतर देशांतून कॅनडामध्ये आलेल्या अनेक लोकांना निर्वासित दर्जा हवा आहे. मला वाटते की, हाच दोष मोठ्या संख्येने खलिस्तानी फुटीरतावाद्यांना कॅनडाकडे आकर्षित करत आहे; कारण ते सुरक्षित आहेत आणि त्यांना येथे आश्रय मिळतो, असा घरचा अहेर टोरंटोचे माजी पोलीस अधिकारी डोनाल्ड बेस्ट यांनी कॅनडाला दिला आहे. ते ‘ए.एन्.आय.’ या वृत्तसंस्थेशी बोलत होते. ‘आम्हाला कॅनडामध्ये समस्या भेडसावत आहे आणि समस्येचा एक भाग म्हणजे खलिस्तानी फुटीरतावादी त्यांना हवे ते करू शकतात’, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कॅनडाच्या आकडेवारीनुसार कॅनडामध्ये २ सहस्र ६०० गुन्हेगारी गट कार्यरत आहेत. हे गट अमली पदार्थांची तस्करी, हिंसा आणि आर्थिक गुन्हे यांसह विविध बेकायदेशीर कामांमध्ये गुंतलेले आहेत.
संपादकीय भूमिकाकॅनडातील लोकांना जे दिसत आहे, ते त्यांनी ट्रुडो सरकारसमोर उपस्थित करून सरकारला यावर कारवाई करण्यासाठी दबाव निर्माण करणे आवश्यक आहे ! |