कोविड-१९ लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात १९ सहस्र आरोग्य कर्मचार्यांना लस देणार ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत
कोविड-१९ लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात गोवा राज्यातील शासकीय, तसेच खासगी रुग्णालयांतील १९ सहस्र आरोग्य कर्मचार्यांना लस देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतर दिली.