हिंदु धर्म, देवता आदींचा होणारा अवमान रोखण्यासाठी ईशनिंदा कायदा करा !

गेल्या अनेक वर्षांपासून नाटक, चित्रपट, विज्ञापने आदींच्या माध्यमांतून हिंदु देवता, साधू, संत आदींचा अवमान करण्यात येत आहे. याचा हिंदूंकडून विरोधही केला जात आहे; मात्र कठोर कायदा नसल्याने आरोपींवर कठोर कारवाई करण्यास मर्यादा येत आहेत.

१००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या क्रमांकाच्या नोटा चलनातून बाद करण्यावर रिझर्व्ह बँकेचा विचार !

१० रुपयांचे नाणे आणून १५ वर्षे झाल्यानंतरही व्यापारी आणि उद्योजक यांनी त्याचा स्वीकार न करणे बँका आणि आर्.बी.आय. यांच्यासाठी मोठी समस्या झाली आहे. १० रुपयांची नाणी बँकांसाठी मोठे ओझे झाले आहे.

नॅशनल मायग्रंट सपोर्ट पोर्टलचा शुभारंभ

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २२ जानेवारी या दिवशी मुख्यमंत्री निवासस्थानी झालेल्या एका कार्यक्रमात नॅशनल मायग्रंट सपोर्ट पोर्टलचा शुभारंभ केला. राज्यात येणार्‍या स्थलांतरित कामगारांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी या योजनेचा लाभ होणार आहे. वेबिनारच्या माध्यमातून हा कार्यक्रम झाला.

नोकरीचे आमीष दाखवून युवतीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी आरोपीला पोलीस कोठडी

नोकरीला लावण्याचे आमीष दाखवून युवतीवर बलात्कार करणारा रतन विष्णु कांबळे (रहाणार नागवे रोड, कणकवली) याला येथील न्यायालयाने २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी बजावली आहे.

राजस्थानमध्ये आयकर विभागाच्या सर्वांत मोठ्या धाडीतून १ सहस्र ७०० कोटी रुपयांची संपत्ती जप्त !

राजस्थानमध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने बेहिशोबी संपत्ती जप्त करण्यात आली. २०० कर्मचारी ५ दिवस धाडीत सापडलेल्या सामानाचे मूल्यांकन करत होते. 

हिंदु नाव धारण करून हिंदु विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण करणार्‍या धर्मांधाला अटक

प्रेम करण्यासाठी धर्म का लपवावा लागतो, हे निधर्मीवादी सांगतील का ?

सावंतवाडी नगरपरिषदेने व्यवसायासाठी जागा द्यावी आणि कह्यात घेतलेले साहित्य परत द्यावे, यासाठी रवि जाधव यांचे उपोषण ४ थ्या दिवशीही चालू

नगरपरिषदेने गाळा हटवून त्यातील साहित्य अवैधरित्या कह्यात घेतले, असा आरोप रवि जाधव यांनी केला असून याच्या विरोधात त्यांनी सहकुटुंब उपोषण चालू केले आहे.

विरोध होणारे प्रकल्प राबवल्यास सरकारच्या विरोधात असहकार मोहीम छेडू ! – गोंयात कोळसो नाका संघटना

लोहमार्ग, महामार्ग दुपदरीकरण आणि तम्नार वीज प्रकल्प हे तीनही प्रकल्प राबवण्यावर गोवा शासन ठाम राहिल्यास असहकार मोहीम छेडण्याची चेतावणी गोंयात कोळसो नाका या अशासकीय संघटनेने दिली आहे.

देशद्रोहाचा गुन्हा असलेली रिव्हॉल्युशनरी गोवन्स विधानसभेच्या सर्व जागा लढवणार

अशासकीय संस्था आणि देशद्रोहाचा ठपका असलेल्या रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे चालू मासाच्या अखेरीस राजकीय पक्षात रूपांतर होणार आहे, अशी घोषणा रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे मनोज परब यांनी केली.

केंद्रीय कृषी कायद्यांविषयी काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्ष अपप्रचार करत आहेत ! – राजकुमार चहर, अध्यक्ष, किसान मोर्चा, भाजप

राजकुमार चहर पुढे म्हणाले, कृषी कायद्यामुळे गोव्यासह सर्व देशाला लाभ मिळणार असल्याचे आगामी काळात सिद्ध होणार आहे.