पुणे येथील श्री पाताळेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेचा सोहळा पार पडला !

‘श्री पाताळेश्वर मंदिर उत्सव समिती’चे अध्यक्ष श्री. मिलिंद एकबोटे असून  ‘सैनिक मित्रपरिवार’ या संस्थेचे प्रमुख श्री. आनंद सराफ हे आहेत. या दोघांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या साथीने कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला.

काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी तरुणांना सट्टा आणि वाळूचोरीचा रोजगार दिला ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

सुनील केदार इतकी वर्षे या मतदारसंघाचे आमदार राहिले. त्यांच्या कार्यकाळात सावनेर मतदारसंघाची काय अवस्था आहे, हे मी सांगण्याची आवश्यकता नाही, असेही फडणवीस म्हणाले.

नागपूर येथे प्रियांका गांधी यांच्या ‘रोड शो’त गोंधळ !

या वेळी प्रियांका गांधी म्हणाल्या की, भाजपच्या समर्थकांना मी शुभेच्छा देते; पण जिंकणार तर महाविकास आघाडीच आहे. यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्याने तणाव वाढला.

बांगलादेशी-रोहिंग्या घुसखोरांवर कडक कारवाई करून त्यांना मतदान प्रक्रियेपासून रोखावे !

घुसखोरांवर तातडीने कडक कारवाई न केल्यास महाराष्ट्राच्या निवडणूक प्रक्रियेवर गंभीर परिणाम होईल. त्यामुळे घुसखोरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.

वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करणार्‍या दांपत्याच्या विरोधात गुन्हा नोंद !

सहाणे दांपत्याने ‘नो-पार्किंग’मध्ये वाहन लावल्याने वाहतूक पोलिसांनी कारवाई करत वाहन उचलून डेक्कन वाहतूक विभागात आणले. त्यानंतर सहाणे यांनी डेक्कन वाहतूक विभागात येऊन गोंधळा घातला.

निवडणूक विशेष

निवडणूक प्रक्रियेतील निवडणूक आयोगाच्या कर्मचार्‍यांसह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सोयीचे जावे, यासाठी १९ नोव्हेंबरला आणि मतदानाच्या दिवशी म्हणजे २० नोव्हेंबरला मध्यरात्री विशेष लोकल फेर्‍या चालवण्यात येणार आहेत.

एकनाथ खडसे यांची राजकीय संन्यासाची घोषणा !

महाराष्ट्रातील राजकारणात ४ दशकांपासून कार्यरत असलेले पूर्वाश्रमीचे भाजपचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी १८ नोव्हेंबरला राजकीय संन्यासाची घोषणा केली.

समर्थ रामदासस्‍वामी यांना ‘लंगोटवाला’ म्‍हणून हिणवत ते छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नसल्‍याचे विधान !

‘एटीएम् गुरु’ या यू ट्यूब चॅनलवर ‘शिवाजीराजे आणि रामदास, कोर्टाचा मोठा निर्णय’ या विषयावर बोलतांना आशिष मगर यांनी समर्थ रामदासस्‍वामींना ‘लंगोटवाला’ म्‍हणून त्‍यांचा अवमान केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार किंवा ‘नोटा’चा वापर करू ! – आनंद दवे, अध्यक्ष, हिंदु महासभा

‘चैतन्य सेवाभावी संस्थे’च्या माध्यमातून ‘असोसिएशन ऑफ डी.एस्.के. व्हिक्टिम्स’कडून १८ नोव्हेंबर या दिवशी दुपारी १ वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार !

महाराष्ट्राच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्या जागी राज्य सरकारने संजय कुमार वर्मा यांना निवडणुकीपुरते महासंचालकपदी नियुक्त केले.