चीनने तैवानवर आक्रमण केल्यास अमेरिका सैनिकी कारवाई करील ! – जो बायडेन  

चीनने  तैवानवर आक्रमण केल्यास अमेरिका सैनिकी कारवाई करेल, अशी चेतावणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी येथे ‘क्वाड’ देशांच्या बैठकीनंतर पत्रकारांच्या एका प्रश्‍नाच्या उत्तरात दिली.

 ‘स्मार्टफोन’ आत्महत्येसाठी कारणीभूत ठरत आहे ! – संशोधन

आधुनिक विज्ञानाच्या अतिरेकाचे दुष्परिणाम ! जे विज्ञान मनुष्याला सोयी उपलब्ध करून त्याचे जीवन सुसह्य करण्यासाठी निर्मिले गेले, तेच मनुष्याच्या अंतास कारणीभूत ठरत आहे ! विज्ञानाचा हा सपशेल पराभव असून विज्ञानाचा उदोउदो करणारे हे लक्षात घेतील का ?

अमेरिकेत चर्चमधील गोळीबारात एकाचा मृत्यू

गोळीबाराच्या वेळी चर्चमध्ये ३० ते ४० जण उपस्थित होते. यांतील बहुतेक जण तैवान वंशाचे नागरिक होते.

पृथ्वीच्या दिशेने प्रचंड वेगाने मार्गक्रमण करत आहे लघुग्रह !

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या वैज्ञानिकांनी दिलेल्या चेतावणीनुसार पृथ्वीच्या दिशेने एक लघुग्रह मार्गक्रमण करत आहे. हा लघुग्रह ताशी १८ सहस्र किमी एवढ्या प्रचंड वेगाने पुढे सरकत आहे.

न्यूयॉर्कमधील सुपरमार्केटमध्ये झालेल्या गोळीबारात १० जण ठार

न्यूयॉर्क येथील बफेलो भागातील जेफरसन अव्हेन्यूजवळ असलेल्या टॉप फ्रेंडली सुपरमार्केटमध्ये सशस्त्र आक्रमणकर्त्याने केलेल्या गोळीबारात १० जणांचा मृत्यू झाला, तर अनेक लोक घायाळ झाले.

इलॉन मस्क यांनी ट्विटरला विकत घेण्याच्या करारावर आणली स्थगिती !

यामागे सामाजिक माध्यमावर साधारण ५ टक्के खोटी खाती असल्याचे त्यांनी कारण दिले आहे. अशी खाती बंद करण्याची मस्क यांची पूर्वीपासून भूमिका आहे. ट्विटरबरोबर झालेल्या कराराचा मस्क पुनर्विचार करू शकतात, असे तज्ञांचे म्हणणे आहे.

चंद्रावरील मातीत रोप उगवण्यात वैज्ञानिकांना यश !

अमेरिकेतील फ्लोरिडा विश्‍वविद्यालयातील एना-लिसा पॉल आणि प्रा. रॉबर्ट फर्ल यांनी हे संशोधन केले असून त्यांना चंद्राची केवळ १२ ग्रॅम माती मिळाली होती. त्यांनी ११ वर्षे संशोधन करून चंद्राच्या मातीत रोप उगवले.

भारतात विरोधी पक्ष दुर्बल ! – श्री श्री रविशंकर

श्री श्री रविशंकर हे सध्या २ मासांच्या अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत. त्यानिमित्ताने झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी वरील प्रतिपादन केले.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील बंदी ट्विटरने उठवली !

जानेवारी २०२१ मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हिंसाचाराला उत्तरदायी ठरवून ट्विटरकडून ट्रम्प यांचे खाते कायमस्वरूपी बंद करण्यात आले होते.

तालिबानने ठार मारलेले भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दिकी यांना ‘पुलित्झर पुरस्कार’ घोषित

भारतातील कोरोना मृतांची दाहकता दाखवणारी छायाचित्रे ही भावनिक जवळीक आणि विध्वंस दाखवणारी आहेत, असे ‘पुलित्झर’च्या संकेतस्थळावर या छायाचित्रांविषयी सांगण्यात आले आहे.