पृथ्वीच्या दिशेने प्रचंड वेगाने मार्गक्रमण करत आहे लघुग्रह !

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या वैज्ञानिकांनी दिलेल्या चेतावणीनुसार पृथ्वीच्या दिशेने एक लघुग्रह मार्गक्रमण करत आहे. हा लघुग्रह ताशी १८ सहस्र किमी एवढ्या प्रचंड वेगाने पुढे सरकत आहे. त्याचा आकार अमेरिकेच्या ४४० मीटर उंच एम्पायर स्टेट इमारतीहून अधिक मोठा आहे. ‘नासा’चे सातत्याने त्याच्यावर लक्ष आहे. हा लघुग्रह भारतीय प्रमाणवेळेनुसार १५ मेच्या रात्री २ वाजून ४८ मिनिटांनी पृथ्वीच्या अगदी जवळून पुढे जाईल.

वर्ष १९०८ मध्ये पूर्व सायबेरियात कोसळलेल्या एका लघुग्रहाने २०० मीटरच्या परिघातील सर्वकाही नष्ट केले होते. १०० मीटरहून अधिक रुंद असणारा कोणताही लघुग्रह ज्वालामुखीच्या स्फोटाच्या तुलनेत जवळपास १० पट अधिक विध्वंस घडवून आणू शकतो.