अमेरिकेत चर्चमधील गोळीबारात एकाचा मृत्यू

घटनास्थळ

कॅलिफोर्निया (अमेरिका) – येथील प्रेबिस्टेरियन चर्चमध्ये करण्यात आलेल्या गोळीबारता एकाचा मृत्यू झाला, तर ५ जण घायाळ झाले. पोलिसांनी आक्रमणकर्त्याला अटक केली असून त्याच्याकडून २ बाँबही जप्त करण्यात आले आहेत.

या गोळीबाराचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गोळीबाराच्या वेळी चर्चमध्ये ३० ते ४० जण उपस्थित होते. यांतील बहुतेक जण तैवान वंशाचे नागरिक होते.