अमेरिकेतही शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ आंदोलने

अमेरिकेतही शेतकर्‍यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आंदोलने करण्यात आली. यामध्ये शीख समुदायाचा मोठा सहभाग होता. सॅन फ्रान्सिको येथील भारतीय वाणिज्य दूतावासावर मोर्चा काढण्यात आला.

संयुक्त राष्ट्रांकडून हिंदु, शीख आणि बौद्ध धर्मियांवरील आक्रमणांकडे दुर्लक्ष ! – भारताची टीका

हिंदु, शीख आणि बौद्ध यांच्यावर पाक, अफगाणिस्तान येथे अनेक दशकांपासून अत्याचार होत असतांना संयुक्त राष्ट्र त्यावर आंधळी, बहिरी आणि मुकी असल्यासारखीच आहेत. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघाचा जगाच्या दृष्टीने आणि भारताच्या दृष्टीने काहीही लाभ नाही. अशी संघटना विसर्जित करणेच योग्य ठरेल !

संयुक्त राष्ट्रांत गांजाला अमली पदार्थ नव्हे, तर औषध म्हणून अनुमती !

संयुक्त राष्ट्राच्या अमलीपदार्थ आयोगाने गांजाला धोकादायक अमली पदार्थाच्या सूचीतून हटवले आहे.

अंतर्गत प्रकरणांत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू नका ! – भारताची कॅनडाच्या पंतप्रधानांना समज

कॅनडामध्ये मोठ्या संख्येने शीख धर्मीय रहातात आणि देहली येथे आंदोलन करणारे शेतकरी मोठ्या संख्येने शीख असल्याने ट्रुडो यांनी मतांच्या लांगूलचालनासाठीच या आंदोलनावर भाष्य केल्याचे लक्षात येते !

लडाखमधील चीनचे बांधकाम ही चिथावणीखोर कृती ! – अमेरिकी सिनेटर राजा कृष्णमूर्ती यांची टीका

अमेरिकेचे सिनेटर असे उघडपणे बोलतात; मात्र भारतातील खासदार असे बोलण्याचे धाडस दाखवत नाहीत !

पाक संयुक्त राष्ट्राने घोषित केलेल्या आतंकवाद्यांना आश्रय देतो ! – भारताची पाकवर टीका

पाकने संयुक्त राष्ट्रामध्ये खोटी कागदपत्रे असणारा अहवाल सादर केल्यावरून भारताने पाकवर टीका केली आहे. पाकने याद्वारे भारतावर पाकमध्ये आतंकवाद भडकावल्याचा आरोप केला आहे.

अमेरिकेतील विश्‍वविद्यालयामध्ये जैन धर्माचे शिक्षण देण्यात येणार

अमेरिकेतील कॅलिफोर्निया विश्‍वविद्यालयाने जैन धर्माचे शिक्षण देणार्‍या एका अध्ययन पिठाची स्थापना केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर पराभव मान्य करत सत्तांतरणाच्या प्रक्रियेला दिली अनुमती !

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेला पराभव न स्वीकारणारे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर पराभव स्वीकारत सत्तेचे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया चालू करण्यास अनुमती दिली आहे.

१०० वर्षांपूर्वी चोरलेली श्री अन्नपूर्णादेवीची मूर्ती लवकरच कॅनडातून भारतात येणार

येथील एका मंदिरातून १०० वर्षांपूर्वी चोरण्यात आलेली आणि नंतर कॅनडातील रेजिना विद्यापिठाच्या मॅकेन्झी कलादालनात ठेवण्यात आलेली श्री अन्नपूर्णादेवीची मूर्ती विद्यापीठ लवकरच भारताकडे सुपुर्द करणार आहे.

अमेरिकेत मॉलमधील गोळीबारात ८ जण घायाळ

अमेरिकेतील विस्कॉन्सिन भागातील मॉलमध्ये झालेल्या गोळीबारात एका लहान मुलासह ८ जण घायाळ झाले असून पोलीस गोळीबार करणार्‍याचा शोध घेत आहेत.