कॅनडा येथे चारचाकी गाडीच्या चोरीला विरोध करणार्‍या हिंदु विद्यार्थ्याची हत्या

टोरंटो येथे चारचाकी वाहनाची चोरी करण्यास विरोध केल्याने गुरविंदर नाथ या २४ वर्षीय भारतीय विद्यार्थ्यावर आक्रमण करण्यात आले. यात त्याचा मृत्यू झाला. हा विद्यार्थी महाविद्यालयातील सुटीच्या काळात पिझ्झा वितरणाचे काम करत होता.

जागतिक तापमानवाढीचा प्रकोप : अमेरिका, युरोप आणि आफ्रिका खंडांत हाहा:कार !

विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या अतिरेकी वापराचेच हे फलित आहे, हे जाणा !

युरोपीय संसदेचा मणीपूर दंगलींच्या संदर्भातील ठराव त्याच्या ‘वसाहतवादी मानसिकते’चे दर्शन ! – भारत

भारताच्या अंतर्गत सूत्रांमध्ये नाक खुपसणार्‍या युरोपीय युनियनला केवळ खडसावणे पुरेसे नसून त्याला अद्दल घडवणे आवश्यक !

जागतिक स्तरावर महासागरांतील ५६ टक्के पाण्याचा रंग झाला हिरवा !

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या अतिरेकी उपयोगामुळे निसर्गाची भरून न येणारी हानी होत आहे. या माध्यमातून विज्ञानाधिष्ठित मानवसमूह स्वत:चा विनाशच ओढवून घेत आहे, हे लक्षात घ्या !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान पुरस्कार प्रदान

हा सन्मान मिळवणारे मोदी ठरले पहिले भारतीय पंतप्रधान !

कुराण जाळल्‍याच्‍या निषेधार्थ स्‍वीडिश मालावर येमेनकडून बंदी !

हुती विद्रोहींनी वर्ष २०१४ च्‍या शेवटी साऊदी अरेबियासमर्थित सरकारला राजधानी सना येथून हटवून स्‍वत:चे वर्चस्‍व प्रस्‍थापित केले. साधारण ९ वर्षांपासून हुती विद्रोहींचे येमेनच्‍या उत्तर क्षेत्रावर संपूर्ण नियंत्रण आहे.

भारतीय खगोलशास्त्रज्ञ अश्‍विन शेखर यांच्या नावे छोट्या ग्रहाचे नामकरण करून सन्मान !

आतापर्यंत केवळ ५ भारतियांनाच मिळाला हा सन्मान ! नोबेल पुरस्कार विजेते सी.व्ही. रमन आणि सुब्रह्मण्यम् चंद्रशेखर, तसेच महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन्, खगोलशास्त्री डॉ. विक्रम साराभाई आणि ‘आयएयू, मनाली’चे माजी अध्यक्ष कल्लाट वेणु बप्पू यांच्या नावानेच अशा प्रकारे ग्रहांचे नामकरण करण्यात आले होते.

स्विडनमध्ये आता कुराण, बायबल आणि ज्यू धर्मियांचे ‘टोरा’ धार्मिक पुस्तक जाळण्याच्या मागणीचे अर्ज !

एका महिलेनेही कुराण जाळण्याची अनुमती पोलिसांकडे मागितली आहे. पोलिसांनी म्हटले आहे की, आम्ही अद्याप कुणाचीही मागणी फेटाळलेली नाही. प्रत्येकाच्या मागणीची समीक्षा केली जाणार आहे.

‘बीबीसी’कडून फ्रान्समधील हिंसाचाराला अप्रत्यक्ष समर्थन देणारे वृत्त प्रकाशित !

‘पत्रकारिता एकांगी नसावी’, हे खरे; परंतु त्याचा समतोल राखतांना हिंसाचाराचे समर्थन करणे, हे केव्हाही निषेधार्हच आहे. अर्थात् भारतातील धर्मांध मुसलमानांना नेहमीच पाठीशी घालणार्‍या बीबीसीकडून फ्रान्ससंदर्भात दुसरी कोणती अपेक्षा करणार ?