श्रीलंकेच्या क्रिकेट खेळाडूला बलात्काराच्या आरोपावरून ऑस्ट्रेलियात अटक  

सिडनी (ऑस्ट्रेलिया) –  बलात्काराच्या प्रकरणी श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू धनुष्का गुणतिलका याला ऑस्ट्रेलियात अटक करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये चालू असलेल्या टी-२० विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी श्रीलंकेचा संघ येथे आला होता. तो पात्रता फेरीत बाद झाल्यानंतर मायदेशी परत गेला; मात्र धनुष्य याला अटक करण्यात आली. २ नोव्हेंबरला एका महिलेने दिलेल्या बलात्काराच्या तक्रारीवरून त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. वर्ष २०१८ साली अशाच एका आरोपामुळे त्याला संघातून निलंबित करण्यात आले होते; पण त्या वेळी त्याची निर्दोष मुक्तता झाली होती आणि तो पुन्हा श्रीलंकेच्या संघात परतला होता.