पाकच्या न्यायालयाकडून जमात-उद्-दवाच्या ३ आतंकवाद्यांना १५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

पाकला काळ्या सूचीत घालू नये म्हणून पाक आतंकवाद्यांच्या अर्थपुरवठ्यावर लक्ष ठेवणार्‍या एफ्.ए.टी.एफ्. संस्थेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा असा प्रयत्न करत आहे, हे जगाला दिसत आहे !

पाकचे पत्रकार कुअंर शाहिद यांनी दाखवला पाकच्या पंतप्रधानांना आरसा !

फ्रान्समधील मुसलमानांवर बोलणारे पाक नेते चीनमधील उघूर मुसलमानांवर मौन बाळगतात ! सोनाराने कान टोचले की, अधिक योग्य ठरते; मात्र पाकसारख्या कोडग्या देशावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, हेही तितकेच खरे !

इस्लामी देशांच्या बैठकीत काश्मीरच्या सूत्रावर चर्चा नाहीच !

पाकिस्तानचा काश्मीरच्या सूत्रावरून पुन्हा एकदा पराभव झाला आहे. पाकने इस्लामी देशांची संघटना ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’च्या (‘ओेआयसी’च्या) परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत काश्मीरच्या सूत्रावर चर्चा करण्याची मागणी केली होती.

पाकमध्ये सरकारने हिंदूंची घरे पुन्हा पाडली

पाकमधील असुरक्षित हिंदूंविषयी कुणी आवाज उठवत नाही, हे लक्षात घ्या !

इस्लामी देशांच्या संघटनेच्या बैठकीत काश्मीरवर चर्चा होणार नाही !

पाकला पुन्हा चपराक ! ‘ऑर्गनायजेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ (ओ.आय.सी.) या इस्लामी देशांच्या संघटनेच्या बैठकीमध्ये काश्मीरवर कोणतीही चर्चा होणार नाही. या बैठकीसाठी हा विषयच ठेवण्यात आलेला नाही !

१० वर्षांची शिक्षा झालेला आतंकवादी हाफिज सईद कारागृहात नाही, तर घरात !

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हाफिज सईद घरामध्येच सुरक्षित असून तो पाहुण्यांना सहज भेटू शकतो.

पाकिस्तानमध्ये आता बलात्कार्‍याला नपुंसक करण्यात येणार

पाकिस्तान असे करू शकतो, तर भारत का नाही ? १३० कोटी लोकसंख्या असणार्‍या भारतात प्रतिदिन अनेक महिलांवर बलात्कार केले जातात, त्यानंतर त्यांच्या हत्याही होत असतात. असे असतांना भारताने आतापर्यंत अशी शिक्षा करण्याचा कायदा का केला नाही ?

पाकमधील व्यवसाय बंद करू ! – गूगल, फेसबूक आदींची पंतप्रधान इम्रान खान यांना चेतावणी

पाक सरकारने संकेतस्थळे आणि सामाजिक माध्यमे यांवर असलेल्या लिखाणाविषयी नवे नियम लागू केले आहेत. यामुळे फेसबूक, गूगल आणि ट्विटर यांनी पाकमधील त्यांचा व्यवसाय बंद करण्याची धमकी दिली आहे.

पाकिस्तानच्या स्वातमध्ये उत्खननात सापडले १ सहस्र ३०० वर्षे जुने मंदिर !

पाकमधील स्वात जिल्ह्यातील बारिकोट घुंडई भागात चालू असलेल्या उत्खननात १ सहस्र ३०० वर्षे जुने मंदिर आढळून आले आहे. येथील डोंगराळ भागात पुरातत्व विभागाच्या तज्ञांनी हे मंदिर शोधले आहे.

आतंकवादी हाफिज सईद याला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा

हाफिज सईदला शिक्षा भोगावी लागण्याची शक्यता अल्पच आहे ! त्याला भारताच्याच हवाली केले पाहिजे !