पाकचे सरकार या आदेशाची किती तत्परतेने कार्यवाही करते, याकडे पाकधील हिंदूंनी लक्ष ठेवून त्याचा पाठपुरावा केला पाहिजे ! – संपादक

इस्लामाबाद (पाकिस्तान) – गणपति मंदिरावरील आक्रमण करण्यासाठी ज्यांनी जमावाला भडकावण्याचे काम केले आणि ज्यांनी मंदिरावर आक्रमण केले त्यांना तात्काळ अटक करा. तसेच मंदिराची दुरुस्ती करा, असा आदेश पाकमधील सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिला आहे. या प्रकरणी न्यायालयाने पंजाब प्रांताचे मुख्य सचिव आणि पोलीस महानिरीक्षक यांना २४ घंट्यांमध्ये न्यायालयात उपस्थित रहाण्याचा आदेश दिला होता. पंजाबच्या भोंग शहरात धर्मांधांनी गणपति मंदिराची, तसेच श्री गणेश आणि शिव-पार्वती यांच्या मूर्तींची तोडफोड केली होती. या घटनेचा व्हिडिओही प्रसारित झाला होता.
Pakistan SC pulls up Imran govt on Temple attack; admits ‘reputation damaged globally’ https://t.co/gZ8YIaXaY6
— Republic (@republic) August 6, 2021
मदरशामध्ये लघुशंका करणार्या हिंदु मुलाला जामीन दिल्याच्या रागातून मंदिरावर आक्रमण करण्यात आल्याचा दावा !
स्थानिक मदरशामध्ये एका ९ वर्षांच्या हिंदु मुलाने मरदशामध्ये लघुशंका केल्याच्या प्रकरणी त्याला जामीनावर सोडल्यामुळे संतप्त धर्मांधांनी या मंदिरावर आक्रमण केल्याचा दावा केला जात आहे. (पाकमध्ये ईशनिंदा कायदा झाल्यापासून हिंदूंवर खोटे आरोप करून त्यांना अटक करण्याचे प्रमाण वाढले आहे. हा त्यातलाच प्रकार नसेल कशावरून ? – संपादक)
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड
Madan Mitra : तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा यांच्या गाडीवर लोकांनी फेकली अंडी
America Indian Shot Dead :अमेरिकेत अज्ञातांकडून भारतीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या
Israel Spying : इस्रायल करत आहे ट्रम्प सरकारची हेरगिरी ! – अमेरिका
हिंदूंनी पुकारलेल्या ‘भटकळ बंद’ला उत्तम प्रतिसाद: मोर्चात सहस्रो हिंदूंचा सहभाग !
इस्रायलमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा !