श्री गणेश, शिव आणि पार्वती यांच्या मूर्तींची तोडफोड
|

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या पंजाब प्रांतातील भोंग शहरामध्ये धर्मांधांनी गणपति मंदिराची तोडफोड केली. मंदिरातील श्री गणेश, शिव आणि पार्वती यांच्या मूर्ती, तसेच झुंबर अन् सजावटीचे काचेचे साहित्य या धर्मांधांकडून फोडण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमातून प्रसारित झाला आहे. यात मोठ्या संख्येने धर्मांध दिसून येत आहेत. या घटनेच्या प्रकरणी अद्याप कुणावरही कारवाई करण्यात आलेली नाही; मात्र मंदिराजवळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पाकच्या पंतप्रधान कार्यालयाने या घटनेची नोंद घेतली असून मंदिरातील तोडफोड प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचा आदेश देण्यात आला आहे. येथील उपायुक्त डॉ. खुरम शहजाद यांनी मंदिराला भेट देऊन निरीक्षण केले.
पोलिसांकडून दुर्लक्ष !
स्थानिक हिंदूंनी पोलिसांकडे याविषयी तक्रार करण्याचा प्रय्तन केला असता त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे हिंदूंनी थेट सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशांकडे आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली, अशी माहिती पाकमधील हिंदु परिषदेचे अध्यक्ष डॉ. रमेश वंकावणी यांनी दिली.
बांगलादेशात धर्मांध मुसलमानांकडून एकाच हिंदु कुटुंबातील चौघांची हत्या
बांगलादेशात पुन्हा हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची तोडफोड !
रेशन माफिया कलीम कुरेशी टोळीवर ‘मकोका’
६० वर्षांच्या अबरार याने ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून केला बलात्कार
पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ३ आतंकवाद्यांचा संशयास्पदरित्या मृत्यू
Ram Temple Raid : श्रीराममंदिरातील दान चोरीतील ८ आरोपींच्या घरी पोलिसांची धाड