माझ्‍याकडे भारताचे आधार कार्ड आहे !

पाकिस्‍तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्‍तर याचा दावा !

पाकचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्‍तर

इस्‍लामाबाद (पाकिस्‍तान) – मला भारत फार आवडतो आणि मी नेहमीच देहलीमध्‍ये जात असतो. एवढेच नाही, तर माझ्‍याकडे भारताचे आधार कार्डही  आहे. त्‍यामुळे मी भारताचाच असल्‍याचे सिद्ध करण्‍यास काही शेष राहिलेले नाही, असे विधान पाकचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्‍तर याने केले आहे.

संपादकीय भूमिका

भारतातील बांगलादेशी आणि पाकिस्‍तानी घुसखोरांकडे आधार कार्ड सापडल्‍याच्‍या सहस्रो घटना समोर आलेल्‍या असल्‍याने जर शोएब अख्‍तर असा दावा करत असेल, तर त्‍यात आश्‍चर्य वाटू नये ! भारतातील प्रशासकीय व्‍यवस्‍थेमध्‍ये भ्रष्‍टाचार इतका मुरला आहे की, भ्रष्‍टाचारी भारताला विकूनही खातील, असेच लोकांना वाटते !