वर्तमानपत्रे आणि नियतकालिक यांतून कुराणचा अवमान केल्यास जन्मठेपेची शिक्षा !

पाकिस्तान सरकारचा आदेश !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानमध्ये वर्तमानपत्र किंवा नियतकालिके यांमध्ये कुराणच्या पवित्र वाक्यांचा अवमान केल्यास कठोर शिक्षा करण्यात येणार आहे. जाणीवपूर्वक अवमान करणार्‍याला जन्मठेपेची शिक्षा देण्यात येणार आहे. या संदर्भात पाकिस्तान सरकारने एक पत्र सर्व प्रकाशकांना पाठवले आहे. त्यात त्यांनी कुराणचे पावित्र्य राखण्याचा आदेश दिला आहे.

संपादकीय भूमिका

पाकिस्तानमध्ये धर्माविषयी कोणतेही अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसल्यानेच सरकार अशा प्रकारचा आदेश देऊ शकते ! भारतातही असे करणे आवश्यक आहे !