लाहोर – आम्ही कधीही पाकसमवेतचे व्यापारी संबंध तोडले नाहीत. याउलट पाकनेच जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर भारतासमवेत व्यापारी संबंध तोडले, असे प्रतिपादन भारताचे पाकमधील उप उच्चायुक्त सुरेश कुमार यांनी केले. ते येथे १७ मार्च या दिवशी ‘लाहोर चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीज’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
भारत ने पाकिस्तान के साथ व्यापारिक संबंध कभी नहीं तोड़े, वह संबंधों को सुधारना चाहता है: भारतीय राजनयिक#India #Pakistan https://t.co/afyfDwS3zj
— Dainik Jagran (@JagranNews) March 18, 2023
कुमार पुढे म्हणाले, ‘‘भारताला कायमच पाकसमवेत चांगले संबंध हवे आहेत; कारण आम्ही आमचा भूगोल पालटू शकत नाही. पाकसमवेतचे व्यापारी संबंध सुरळीत व्हावेत, अशी आमची इच्छा आहे. आपण ‘समस्या आणि परिस्थिती कशी सुधारता येईल ?’, हे पहायला पाहिजे.’’ ‘लाहोर चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीज’चे अधक्ष काशिफ अनवर यांनीही ‘दोन्ही देशांतील व्यापारी संबंध सुरळीत होण्यासाठी राजकीय, आर्थिक आणि सामाजिक पातळ्यांवर प्रयत्न करणे आवश्यक आहे’, असे सांगितले.