हाफिज सईद याला ठार मारण्यासाठी ८ कोटी रुपयांची सुपारी

मुंबईवरील २६/११ च्या आतंकवादी आक्रमणाचा सूत्रधार हाफीज सईद याला विदेशातील गुप्तचर संस्थेने ठार मारण्यासाठी ८ कोटी रुपयांची सुपारी दिली आहे.

(म्हणे) ‘अफगाणिस्तानमधील अशांतीच्या मागे भारत !’ – पाकचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांचा कांगावा

अफगाणिस्तानमधील भारताच्या प्रभावामुळे या संकटग्रस्त देशामध्ये अराजकतेची स्थिती निर्माण झाली आहे. येथील अशांतीला भारतच कारणीभूत आहे, असा आरोप पाकचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांनी केला आहे.

मुंबईवरील २६/११ च्या आक्रमणामुळे जगात पाकची प्रतिमा बिघडली ! – पाकचे माजी विदेश सचिव रियाज महंमद खान

मुंबईवरील २६/११च्या आतंकवादी आक्रमणासाठी भारताने पाकला उत्तरदायी ठरवल्यामुळे पाकची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा बिघडली. त्यामुळे काश्मीरमधील आमच्या हितांना हानी पोहोचली,

अफगाणिस्तानमध्ये पाकच्या दूतावासातील अधिकार्‍याची हत्या

अफगाणिस्तानच्या जलालाबादमध्ये पाकच्या दूतावासातील एका अधिकार्‍याची हत्या करण्यात आली आहे. त्याला त्याच्या निवासाजवळील दुकानामध्ये गोळी मारून ठार करण्यात आले.

पाकमध्ये मौलानाकडून लहान मुलाशी लैंगिक चाळे

पाकमध्ये  मौलाना अब्दुल रऊफ यजदानी नावाच्या एका मौलानाने चारचाकी वाहनामध्ये एका लहान मुलाशी लैंगिक चाळे केल्याचे चित्रीकरण एका पाकिस्तानी पत्रकाराने पोस्ट केले.

पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांचे पाकविरोधात आंदोलन

पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट आणि बाल्टीस्थान येथे तेथील नागरिकांनी २२ ऑक्टोबरला पाकच्या विरोधात आंदोलन केले. पाक सरकार आणि पाकचे सैन्य यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले.

गुप्तहेर ठरवण्यात आलेल्या भारतीय अभियंत्याला साहाय्य करणारी पाकिस्तानी महिला पत्रकार २ वर्षे बेपत्ता झाल्यानंतर परतली !

गेल्या २ वर्षांपासून पाकिस्तानातील झीनत शहजादी ही महिला पत्रकार बेपत्ता होती. ती पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर दिसल्यानंतर तिला पाकमध्ये आणण्यात आले आहे.

सुषमा स्वराज यांच्याशी झालेल्या उच्चायुक्तांच्या भेटीत कुलभूषण जाधव यांच्या अटकेप्रकरणी चर्चा नाही ! – पाकचे स्पष्टीकरण

पाकचे भारतातील नवनियुक्त उच्चायुक्त सोहेल महमूद यांनी नुकतीच भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. या भेटीमध्ये कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणावर चर्चा करण्यात आली, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांक अहमदिया संप्रदायावर अगणित अत्याचार ! – न्यूयॉर्क टाइम्स

धार्मिक अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेमध्ये पाकचे नाव अत्यंत वाईट आहे. पाकिस्तानमधील स्वतःला मुसलमान म्हणवणार्‍या अहमदिया संप्रदायाच्या लोकांवर अगणित अत्याचार होत आहेत, असे न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखक महंमद हनीफ यांच्या लेखामध्ये म्हटले आहे.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये आतंकवाद्यांना पाकचे सैन्य प्रशिक्षण देते ! – पाकव्याप्त काश्मीरमधील सामाजिक कार्यकर्त्याची माहिती

पाकचे सैन्य पाकव्याप्त काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांना प्रशिक्षण देत आहे आणि त्यांना सुरक्षित स्थळी ठेवत आहे, अशी माहिती पाकव्याप्तमधील सामाजिक कार्यकर्ता तौकीर गिलानी यांनी दिली आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now