पाकिस्तानातील सत्तास्थापनेतील गणित !
इस्लामाबाद/लाहोर – पाकमध्ये निवडणूक निकाल लागल्यानंतर सरकार स्थापनेसाठी बैठका चालू आहेत. बिलावल भुत्तो-झरदारी यांचा ‘पीपीपी’ पक्ष (पाकिस्तान पीपल्स पार्टी) आणि शरीफ कुटुंबाचा ‘पी.एम्.एल्.एन्.’ (पाकिस्तान मुस्लिम लीग नवाझ) यांच्यात महत्त्वाच्या वाटाघाटी चालू आहेत. दोन्ही पक्षांमध्ये अडीच-अडीच वर्षांच्या कालावधीसाठी त्यांचा उमेदवार पंतप्रधानपदावर असेल, या सूत्रावर एकमत झाले आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांचे युती सरकार पाकिस्तानमध्ये सत्ता स्थापन करण्याची चिन्हे आहेत.
सौजन्य : अमर उजाला
सर्वांत मोठा पक्ष म्हणून निवडून आलेल्या इम्रान खान यांनी समर्थन दिलेल्या अपक्षांपैकी काही जणांनी नवाझ शरीफ यांची भेट घेतली. त्यावर इम्रान खान यांच्या ‘पीटीआय’चे नेते गौहर अली खान म्हणाले की, आम्हाला भीती होती की, काही लोक असे करतील. पक्ष पालटणार्यांना जनता क्षमा करणार नाही. आम्ही विरोधी पक्षात बसण्यास तयार आहोत.