PAK ELECTIONS Terror Attack : पाकिस्तानात ८ फेब्रुवारी या दिवशी निवडणूक, ७ फेब्रुवारीला झालेल्या  आतंकवादी आक्रमणात १२ ठार !

(‘बनाना रिपब्लिक’ म्हणजे एका गोष्टीच्या निर्यातीवर संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था चालवणे)

इस्लामाबाद (पाकिस्तान) – ८ फेब्रुवारीला पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणूक होणार आहेत. त्याच्या आदल्या दिवशीच बलुचिस्तान प्रांतात पुन्हा एकदा आतंकवादी आक्रमण झाले. प्रांतातील पिशीन शहरात झालेल्या या स्फोटात १२ जण ठार झाले, तर ३० जण घायाळ झाले. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार हे आक्रमण अपक्ष उमेदवार असफंद यार खान काकर यांच्या कार्यालयाबाहेर झाले. पाकिस्तान निवडणूक आयोगाने या आक्रमणाचा अहवाल मागवला आहे.

सौजन्य विऑन 

५ फेब्रुवारी या दिवशी झालेली आक्रमणे !

१.  बलुचिस्तान प्रांतातील निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर स्फोट !

२. खैबर पख्तुनख्वा प्रांतातील दरबार शहरात असलेल्या पोलीस ठाण्यावर झालेल्या आक्रमणात १० पोलिसांचा मृत्यू, तर ६ जण घायाळ !

संपादकीय भूमिका 

केवळ जिहादी आतंकवादाची निर्यात करण्यात हतखंडा असणारा पाकिस्तान  ‘बनाना रिपब्लिक’ असल्याने तेथे लोकशाही पद्धतीने होणार्‍या निवडणुकांना काही अर्थ आहे का ?