मतमोजणीत मोठी गडबड करण्यात आल्याची पाकच्या प्रसारमाध्यमांचे वृत्त
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ८ फेब्रुवारीला मतदान झाल्यानंतर ९ फेब्रुवारीला सकाळपासून मतमोजणीला प्रारंभ झाला आहे; मात्र मजमोजणीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा करण्यात येत असल्याचे वृत्त पाकच्या प्रसारमाध्यमांकडूनच देण्यात आले आहे. मतमोजणीनंतर इम्रान खान समर्थित अपक्ष उमेदवारांना अधिक जागांवर आघाडी मिळाल्याचे दिसून आले आहे. याविषयी पाकच्या निवडणूक आयोगाने सायंकाळी ५ च्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार इम्रान खान समर्थित उमेदवार २८ ठिकाणी, नवाझ शरीफ यांचा पक्ष २६, तर बिलावल भुत्तो यांचा पक्ष १८ जागांवर आघाडीवर आहे. पाकच्या प्रसारमाध्यमांनुसार इम्रान खान यांचे ८० हून अधिक उमदेवार पुढे असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे इम्रान खान यांचे सरकार येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे इम्रान खान यांना पुन्हा सत्ता मिळू नये; म्हणून पाकच्या सैन्याकडून आटोकाट प्रयत्न करण्यात येत आहे. सैन्याकडून उमेदवारांच्या विजयाची घोषणा करण्याचे टाळले जात आहे, असे पाकच्याच प्रसारमाध्यमांकडून म्हटले जात आहे.
सौजन्य इंडिया टूडे