पाकिस्तानमध्येही महिलांच्या सुरक्षेसाठी योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या नेत्याची आवश्यकता ! – पाकिस्तानी महिला

पाकिस्तानी महिलांची मागणी !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘जर कुणी महिलांची छेड काढली, तर त्याला पुढच्या चौकात पकडून त्याचा ‘राम नाम सत्य है’ होईल (ठार केले जाईल), अशी चेतावणी दिली होती. या विधानाची पाकिस्तानातही चर्चा होत आहे. पाकिस्तानमधील काही ‘यू ट्युब’ चॅनल्सवाल्यांनी या विधानावरून तेथील महिलांशी चर्चा केली, तेव्हा त्यांच्यापैकी बहुतेक महिलांनी त्यांचा विनयभंग करणार्‍यांवर कठोर कारवाई केली पाहिजे. योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे पाकिस्तानातही मुलींची छेडछाड करणार्‍यांना तोंड देण्यासाठी सक्षम नेत्याची आवश्यकता आहे, असे सांगितले.

सौजन्य एएनआय न्यूज 

१. पाकिस्तानमध्ये उद्या ८ फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत बहुतांश पक्षांनी महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक आश्‍वासने दिली आहेत. या सगळ्यामध्ये योगी आदित्यनाथ यांच्या या विधानाचीही चर्चा होत आहे. पाकिस्तानातही महिलांना समान अधिकार मिळायला हवेत, असे तेथील तरुणींचे म्हणणे आहे.

२. पाकिस्तानी तरुणींनी सांगितले की, जेव्हाही त्या घराबाहेर जातात, तेव्हा त्यांना अनेक प्रकारच्या टीपण्या ऐकायला मिळतात. पाकिस्तानमध्ये महिलांना बिर्याणी आणि मिठाई खातांना बुरखा घालण्यास सांगितले जाते. याउलट भारतात तरुणी सहजतेने बाहेर पडतात, नोकरी करतात आणि राजकारणातही सहभागी होतात. यामागील एक मोठे कारण म्हणजे तेथे गैरप्रकार करणार्‍यांवर कडक कारवाई केली जाते.

संपादकीय भूमिका 

केवळ पाकिस्तानलाच नव्हे, तर भारतातही सर्व राज्यांमध्ये योगी आदित्यनाथ यांच्यासारख्याच मुख्यमंत्र्यांची आवश्यकता आहे, असेच जनता म्हणेल !