इस्लामाबाद – पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले आहेत. या निवडणुकीत आतंकवादी हाफीज सईद याचा मुलगा तल्हा सईद यालाही उमेदवारी देण्यात आली होती. तो लाहोरमधून पराभूत झाला आहे.
सौजन्य झी न्यूज
हाफीद सईद याच्या ‘पाकिस्तानी मरकझी मुस्लिम लीग’ या पक्षाने अनेक जागांवर त्याचे उमेदवार उभे केले होते. तल्हाचा पराभव करणार्या नेत्याचे नाव लतीफ खोसा असून ते पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे निकटवर्तीय मानले जातात.
तल्हा सईद हा लष्कर-ए-तोयबाचा क्रमांक दोनचा आतंकवादी मानला जातो. हाफीज सईदनंतर त्याच्या संपूर्ण आतंकवादी साम्राज्याचा कारभार तल्हा सईद पहातो. भारत सरकारने तल्हा याला आतंकवादी घोषित केले आहे. भारतातील लष्कर-ए-तोयबाच्या आक्रमणामागे तल्हा सईदचा हात होता, असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे.